शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Pulwama Attack : 'नरेंद्र मोदी हे 'प्राइम टाइम मिनिस्टर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 09:28 IST

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे. 

ठळक मुद्देपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.'पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग चित्रीकरण करीत होते'जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्याच्या सात दिवसांनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला होता.

नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही 'प्राइम टाइम मिनिस्टर' तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे. 

राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून मोदींवर टीका केली आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती मिळल्यानंतरही तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर शूटिंगमध्ये व्यस्त होते असे हिंदीमध्ये ट्वीट केले आहे. 'पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग करीत होते, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच PhotoShootSarkar हा हॅशटॅग वापरला आहे. 

'जवानांवर हल्ला झाल्यानंतरही मोदी शूटिंगमध्ये बिझी होते'

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्याच्या सात दिवसांनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला होता. 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशातील 40 जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कॉर्बेट पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. जगात असा कुठला पंतप्रधान असेल का?, असा प्रश्नही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला होता. पुलवामा हल्ला 3 वाजून 10 मिनिटांनी झाला आणि मोदी संध्याकाळी 6.10 वाजता शूटिंगमध्ये बिझी होते. तर दुसरीकडे देश छिन्नविछिन्न शहिदांच्या मृतदेहांकडे पाहत होता. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चुली बंद होत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधल्या रामनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-नाश्ता करत होते. जगातल्या कोणत्याही देशाला क्वचितच असा पंतप्रधान लाभला असावा. भारताचे पंतप्रधान पुलवामा हल्ल्याच्या चार तासांनंतरही वनविहार करण्यात व्यस्त होते. जवानांवर हल्ला झाला, त्यानंतरही त्यांचं तीन तास शूटिंग सुरू होते. पुलवामा हल्ल्यानंतरही मोदींच्या सभा थांबल्या नाहीत असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शूटिंगमध्ये व्यस्त होते या काँग्रेसने केलेल्या आरोपाचे भाजपाने जोरदार खंडन केले आहे. हे खोटे वृत्त असून शूटिंगसकाळीच करण्यात आले होते, असेही भाजपाने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी, तुमच्या खोट्या वृत्तांमुळे भारत त्रस्त झाला आहे, सकाळी काढण्यात आलेली छायाचित्रे दाखवून देशाची दिशाभूल करणे थांबवा, हल्ल्याची कल्पना कदाचित तुम्हाला आधीच असेल, जनतेला सायंकाळीच त्याची माहिती मिळाली, असे भाजपाने ट्वीट केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस