शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
3
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
11
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
12
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
13
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

Pulwama Attack :काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचे, सांगताहेत 'वाचकांची पत्रे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 5:10 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

काश्मिरी तरुणांंचे प्रबोधन गरजेचेदहशतवादी हल्ले रोखण्यासाठी केवळ सर्जिकल स्ट्राइक किंवा युद्ध हे उत्तर नसून काश्मीरमधील देशविरोधी कारवाया करणाऱ्या तरुणांना त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करायला हवा. जेणेकरून काश्मीरमध्ये इतर ठिकाणच्या भारतीयांना तेथे स्थावर मालमत्ता खरेदी करता येईल. या माध्यमातून निर्माण होणाºया संपर्कातून तेथील तरुणांच्या मनात इतर भारतीयांबद्दल असलेला चुकीचा समज दूर होऊ शकेल. काश्मिरी तरुणांच्या वैचारिक परिवर्तनावर भर द्यावा. केवळ युद्धानेही हा प्रश्न सुटणारा नाही. जैश-ए-मोहम्मद संघटनेचा मुख्य संस्थापक मौलान मसूद अजहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यास चीनचाही नकार आहे. म्हणूनच पाक व चीनच्या बाबतीत सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, राज्याचे विशेष सरकारी वकील.

पाकला सर्व बाजूंनी घेरा...

या हल्ल्याने आता नवा कडवा अध्याय सुरू झाला आहे. भारतात येऊ घातलेल्या निवडणुकांचा विचार करुन नियोजनपूर्वक हा हल्ला केला गेला आहे. रॉला आता अधिक मोकळीक देऊन मौलाना मसूद वा जैशच्या मुख्यालयावर हल्ला झाला पाहिजे.आताच पाकला सर्व बाजुंनी नाही घेरले तर हे युद्ध आपल्याला असेच अनेक दशके खेळावे लागेल.- कर्नल श्री. खासगीवाले, नाशिककारागृहांतील दहशतवाद्यांना गोळ्या घालाभारतातील कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या सर्व दहशतवाद्यांना गोळ्या घाला. आपण भरतीय संयम, शांतता आणि विचारीपणाने वागतो त्याचा गैरफायदा पाकिस्तान वारंवार घेतो. या हल्ल्यानंतर उलट जबरदस्त प्रत्युत्तर करून त्यांना त्यांची औकात दाखवून द्यावी.- युनूस मेमन,घाटंजी, यवतमाळपरिवर्तन करावे

काश्मिरमधील दहशतवाद, हा राजकारणाबरोबरच धार्मिक तसेच सांस्कृतिक कारणांशी निगडीत आहे. स्थानिक प्रभावी नेतेमंडळींना एकत्र करुन तसेच धार्मिक तत्त्वज्ञ, विचारवंत यांना सोबत घेऊन स्थानिक तरुणांचे वैचारिक परिवर्तन घडविले पाहिजे. त्यांच्यासाठी अर्थाजनाची नवनवीन साधने उपलब्ध करावीत, शैक्षणिक सुविधा वाढवाव्यात. हा प्रश्न केवळ युद्ध करुन संपुष्टात येणार नाही, याची जाणीव ठेवावी.- प्रा. डॉ. बी. आर. सोनावणे, वडेल, मालेगाव, जि. नाशिक.निवडणुका उधळण्याचे षड्यंत्रपुलवामामधील दहशतवाद्यांचा हल्ला म्हणजे भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका उधळून लावण्याच्या षडयंत्राचा एक भाग वाटतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली पाहिजे. असहकाराची वज्रमूठ घट्ट केल्यास दहशतवाद्यांचे नक्कीच धाबे दणाणेल.- गंगारेड्डी बोडखे, वणी, यवतमाळकीड खोडात, फवारणी पानांवर नकोस्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय इतकं जबरदस्त प्लॅनिंग होऊच शकत नाही. कीड खोडातच आहे पानांवर वरवर फवारणी काय फायद्याची? सैन्यावर दगड उगारणाऱ्या गोळी घालायची परवानगी सैन्याला द्यावी. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, हे तेथील माथेफिरूना ठणकावून सांगायची वेळ आली आहे.- बलभीम दहिफळे, चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूरदहशतवाद निर्मूलन अभ्यासक्रम हवा

शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘दहशतवाद निर्मूलन’ या विषयाचा समावेश करावा. जेणेकरून योग्य वयातच दहशतवादाचा राक्षसी चेहरा मुला-मुलींना समजेल. सातत्याने प्रबोधन झाल्यास दहशतवादाला आळा बसेल. दहशतवादी नव्हे तर त्यांचे विचार मारून दहशतवाद संपेल.- निकिता जाधव, रावेत शिंदेवस्ती-हवेली, जि. पुणे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीद