शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 21:57 IST

चीन आणि पाकिस्तान यांच्या संबंधांचं विक्रम सूद यांच्याकडून विश्लेषण

हैदराबाद: काश्मीरच्या पुलवामात झालेला दहशतवादी हल्ल्यामागे एक व्यक्ती नव्हे, तर एक संघटना असल्याचं रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी म्हटलं आहे. सुरक्षेतील त्रुटीदेखील या हल्ल्याला जबाबदार असल्याचंदेखील सूद म्हणाले. सूद यांनी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. सुरक्षेत हलगर्जीपणा असल्याशिवाय अशा प्रकारचा हल्ला होऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.हल्लेखोरांना सीआरपीएफ जवानांचा ताफा जाणार असल्याची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे यामागे एक नव्हे, तर बऱ्याच व्यक्ती आहेत, असं सूद यांनी म्हटलं. भारतानं या हल्ल्याचा बदला घ्यावा, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर हा काही बॉक्सिंगचा सामना नाही. त्यामुळे एकानं ठोसा मारल्यावर दुसऱ्यानं तिच कृती करायला नको, असं उत्तर त्यांनी दिलं. 'या हल्ल्याचा बदला कधी, कुठे आणि कसा घ्यायचा ते सैन्य ठरवेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. चीननं खोडा घातल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला अडचणी येत आहेत. पाकिस्तानच्या सांगण्यावरुनच चीन या कुरापती करत आहे,' असंदेखील सूद म्हणाले.  जेव्हा जेव्हा मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची वेळ येते, त्यावेळी फक्त चीन पाकिस्तानच्या बाजूनं उभा राहतो. शिनजियांग प्रांतातल्या इस्लामिक संघटना पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांशी संपर्क करतील, असं चीनला वाटत असल्यानं त्यांच्याकडून खोडा घातला जातो, असं विश्लेषण 31 वर्षे गुप्तचर विभागात काम केलेल्या सूद यांनी केलं. चीन आणि पाकिस्तान परस्परांचे हितसंबंध जपतात. चीन पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या बाजूनं उभा राहतो. तर आपल्या देशातलं दहशतवादी चीनसाठी डोकेदुखी ठरू नयते, याची काळजी पाकिस्तानकडून घेतली जाते, असं सूद म्हणाले.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश ए मोहम्मदchinaचीनPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी