शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सानिया मिर्झा 'पाकिस्तानची सून', तिला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावरून हटवा!- भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 2:33 PM

Pulwama Attack : भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी वादग्रस्त विधान करुन नवीन वादाला आमंत्रण दिले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावर हटवा, अशी मागणी राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे.

नवी दिल्ली - भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी वादग्रस्त विधान करुन नवीन वादाला आमंत्रण दिले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावर हटवा, अशी मागणी राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. सोबत त्यांनी सानिया मिर्झाचा 'पाकिस्तानची सून' असा उल्लेखही केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने सानिया मिर्झाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पद काढून घ्यावे, अशी मागणी राजा सिंह यांनी केली आहे. राजा सिंह हे तेलंगणा विधानसभेत भाजपाचे एकमेव आमदार आहेत.   

राजा सिंह यांनी म्हटले आहे की, ''सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पदावर हटवण्यात आले. सानियाऐवजी सायना नेहवाल अथवा पी.व्ही. सिंधूसारख्या खेळाडूंना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर पद देण्यात यावे''.  तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी जुलै 2014मध्ये सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नेमले होते. पण भाजपा सुरुवातीपासूनच सानिया मिर्झाच्या नावाला विरोध करत आला आहे. 

...सानिया मिर्झानं खडसावले

दरम्यान, टेनिसपटू सानिया मिर्झाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहली. यावरुन नेटिझन्सकडून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यानंतर सानियाने चांगल्याच शब्दांत टीका करणाऱ्या नेटकऱ्यांचा समाचार घेतला. सानियाने म्हटले की,''सेलेब्रिटींना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणत्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. त्याने सेलिब्रिटींच्या मनात देशाप्रती प्रेम आहे की नाही, हे सिद्ध होते, असाच अनेकांचा समज असतो. पण, सेलेब्रिटींवर टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रासलेल्या असतात आणि राग व्यक्त करण्यासाठी त्यांना कोण भेटत नाही. त्यामुळे ते सेलेब्रिटींना लक्ष्य करून द्वेष पसरवतात. मी आपल्या देशासाठी खेळते. याद्वारे मी आपल्या देशाची सेवा करतो'', अशा शब्दांत तिनं टीका करणाऱ्यांना खडसावले आहे. सीआरपीएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असेही तिनं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

 

 

 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाBJPभाजपाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान