भीमाशंकर कारखान्यातर्फे ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
अवसरी : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भीमाशंकर कारखान्यातर्फे ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन
अ सरी : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर येथे शेतकरी विभागातील कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम भीमाशंकर साखर कारखाना व नेटाफिम इंडिया कंपनी यांच्या विद्यमाने झाला. परिसंवादात प्रदीप वळसे पाटील म्हणाले, ' साखर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकर्यांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना कर्मचारी ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष शेतावर काम करताना कर्मचार्यांकडील माहिती काळानुरूप परिपूर्ण असणे आवश्यक असते. शेती विभागात काम करणारे कर्मचारी म्हणजे कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे.'यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख,चंद्रकांत ढगे, संचालक अशोक घुले, चंद्रकांत ढोबळे, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, नेटाफिम कंपनीचे विशाल भालेराव, शैलेश दगडे उपस्थित होते. सहायक ऊस विकास अधिकारी दिनकर आवक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेतकरी अधिकारी अंकुश आढाव यांनी आभार मानले.छायाचित्र ओळ : पारगाव (ता. आंबेगाव) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन कारखान्याचे संचालक ॲड. प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छायाचित्र : प्रताप हिंगे)