शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारली, १३ बँकांनी नोंदवला नफा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:35 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सरकारी बँकांच्या प्रमुखांशी झालेल्या बैठकीनंतर माहिती

नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून एनपीएच्या ओझ्याखाली असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची स्थिती सुधारली असून, १३ बँकांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नफाही नोंदवला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखांशी झालेल्या बैठकीनंतर शनिवारी दिली.मार्च २०१८मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सकळ अ-कार्यरत मालमत्ता (जीएनपीए) ८.९६ लाख कोटी रुपयांच्या होत्या. सप्टेंबर २०१९मध्ये मात्र त्या ७.२७ लाख कोटींपर्यंत खाली आल्या, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. एनपीए खाली आल्यामुळे त्यासाठी कराव्या लागणाऱ्या बँकांच्या तरतुदीत लक्षणीय घट झाली आहे. बँकांचा कव्हरेज रेशो सुधारला आहे. परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील १३ बँकांनी वित्त वर्ष २०२० च्या पहिल्या सहामाहीत नफ्याची नोंद केली आहे.एस्सारविरोधातील प्रक्रियेनंतर बँकांचे ३८,८९६ कोटी रुपये वसूल झाले आहेत. याशिवाय गेल्या साडेचार वर्षांत ४.५३ लाख कोटी रुपये वसूल झाले. सार्वजनिक बँकांनी मागील तीन वर्षांत २.३ लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.सार्वजनिक बँकांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात घोटाळ्यांसंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना सीतारामन यांनी बैठकीत दिल्या. बँकांनी ठोस, प्रामाणिक व्यावसायिक निर्णय घेतले असतील, तर त्यांची पाठराखण करू. मात्र, व्यावसायिक अपयश व घोटाळे यात निश्चित फरक केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सुनावले आहे.

तीन ‘सी’ची भीती नकोबँकांनी तीन ‘सी’ला घाबरू नये, असेही त्या म्हणाल्या. सीबीआय, कॅग व सीव्हीसी यांना तीन ‘सी’ म्हटले जाते. काही काळापासून बँका या तीन ‘सी’च्या भीतीखाली आहेत. काही बँकांनी निर्णय घेण्याचेही टाळले. त्यामुळेच सीबीआय संचालकांच्या उपस्थितीत त्याबाबतचा संभ्रम दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी सीबीआय आता बँक अधिकाऱ्यांबरोबर चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यात अंमलबजावणी संचालनालय, महसूल गुप्तचर संचालनालय व सीमा शुल्कचा समावेश आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन