शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडून 'चौकीदार' होण्याची अपेक्षा ठेवू नका; 3.20 लाख बँक अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 07:48 IST

सरकारी बँकांमधील अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 'मैं भी चौकीदार' मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र देशातील सरकारी बँक अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या 'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं या संघटनेनं याबद्दल असमर्थतता दर्शवली आहे. यासाठी संघटनेनं थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलं आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, असा पवित्रा संघटनेनं घेतला आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'नं या इंग्रजी दैनिकानं हे वृत्त दिलं आहे.'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं (एआयबीओसी) पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला आहे. यामध्ये बँकांचं विलिनीकरण, कर्मचारी भरती यांच्यासह अनेक प्रश्नांचा समावेश आहे. या पत्राची प्रत आर्थिक सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनलाही (आयबीए) पाठवण्यात आली आहे. एआयबीओसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास 3 लाख 20 हजार अधिकारी (एकूण अधिकाऱ्यांच्या 85 टक्के) या संघटनेचे सदस्य आहेत. 'सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ समस्यांकडे लक्ष न देता तुम्ही आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. सरकारी बँक कर्मचारी सरकारच्या धोरणांमुळे त्रासलेले आहेत,' असं एआयबीओसींनं मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. एआयबीओसीचा विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाला विरोध आहे. याविरोधात संघटनेनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. बँकांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन बँकांच्या कामगिरीवर आधारित असावं, यासाठी इंडियन बँक्स असोसिएशन प्रयत्नशील आहे. यालाही बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक