शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

PUBG गेम आता फक्त सहा तासच खेळता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 12:14 IST

पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे.

ठळक मुद्देपबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे.पबजी एका नव्या फीचरची चाचणी करत असून हेल्थ रिमाइंडर असं या फीचरचं नाव आहे.सहा तास पूर्ण झाल्यानंतर पबजी प्लेअर्सना एक नोटीफीकेशन पाठवण्यात येईल. त्यानंतर हा गेम बंद होईल.

नवी दिल्ली - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे. गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी आहे. यासंबंधीचे परिपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. तसेच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली होती. पबजी या खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पबजी एका नव्या फीचरची चाचणी करत आहे. हेल्थ रिमाइंडर असं या फीचरचं नाव असून भारतातील अनेक शहरात याची चाचणी होत आहे. पबजीचं हे नवं फीचर आल्यानंतर युजर्स सहा तासांहून अधिक वेळ पबजी खेळू शकणार आहे. सहा तास पूर्ण झाल्यानंतर पबजी प्लेअर्सना एक नोटीफीकेशन पाठवण्यात येईल. त्यानंतर हा गेम बंद होईल. तर काही युजर्सनी पबजी खेळत असताना सुरुवातील दोन तासांनी वेळेबाबत एक मेसेज येतो त्यानंतर चार तासांनी तुमचा वेळ संपल्याचा एक मेसेज येत असल्याची माहिती दिली आहे. 

PUBG खेळणं पडलं महागात, 10 जणांना अटककाही दिवसांपूर्वी राजकोटमध्ये पबजी खेळणं काही लोकांना महागात पडलं होतं. गुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे. मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनीअटक केली होती. पबजीवर परिक्षेच्या काळात म्हणजेच 9 मार्चपासून बंदी घालण्यात आली असून 30 एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांना अटक केली होती. 

'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरलेपंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी जालंधरमध्ये ही घटना घडली. पबजी खेळण्यासाठी त्यासंबंधीत काही सामान आणण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती मिळली होती. मुलाच्या वडिलांनी बँक अकाउंटमधून 50,000 रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र नंतर आपल्याच मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली. 

PUBG वर बंदी आणा, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'PUBG' या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी एका चिमुकल्याने काही दिवसांपूर्वी केली होती.  मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं होतं. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं. PUBG मुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुलं हिंसक होत असल्याचं सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. 'सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,' असे त्यांनी म्हटले होते. 

'तो' सलग 10 दिवस PUBG खेळला, अन्...सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.  

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमIndiaभारतGujaratगुजरातtechnologyतंत्रज्ञान