शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पबजीमधला गेमिंग पार्टनर आवडला; महिलेनं पतीकडे घटस्फोट मागितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:32 IST

पबजीमुळे एक संसार मोडण्याच्या मार्गावर

अहमदाबाद: पबजीमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर आता पबजीमुळे एका महिलेनं पतीकडून घटस्फोट मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेमिंग पार्टनर आवडल्यानं एका मुलाची आई असलेल्या महिलेनं घटस्फोटाची मागणी केली आहे. यासाठी तिनं महिला हेल्पलाईनशी संपर्क साधून मदतदेखील मागितली. सध्या ही महिला पतीचं घरी सोडून माहेरी राहते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पबजीमुळे एक संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. पबजीमधला पार्टनर आवडल्यानं घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी मदत करा, असा फोन महिला हेल्पलाइनमध्ये (181) काम करत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आला. फोन करणारी महिला एका प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याची माहिती अधिकारी महिलेनं दिली. कौटुंबिक वादामुळे नव्हे, तर पबजीमधील पार्टनरसोबत राहण्याची इच्छा असल्यानं घटस्फोट हवा असल्याचं महिलेनं हेल्पलाईनला सांगितलं. 'फोन करणाऱ्या महिलेचं वय 19 वर्षे आहे. गेल्याच वर्षी तिचा विवाह एका बांधकाम कंत्राटदारासोबत झाला. तिला एक मूलदेखील आहे. काही महिन्यांपूर्वी तिला पबजीचं व्यसन जडलं. ती सतत पबजी खेळू लागली. यादरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली. तो तरुण नियमितपणे पबजी खेळायचा,' असं हेल्पलाईन कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं. 'पतीशी कोणताही वाद होत नाही, असं त्या महिलेनं सांगितलं. तिला केवळ पबजीमुळे संपर्कात आलेल्या त्या तरुणासोबत राहायचं आहे. त्यासाठी ती पतीचं घर सोडून माहेरी आली आहे. या महिलेचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात आहे,' अशी माहिती हेल्पलाईनमध्ये समुपदेशक असलेल्या सोनल सागठिया यांनी दिली.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमDivorceघटस्फोट