शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

‘पीटीआय’ने घेतली चिनी राजदूतांची मुलाखत; प्रसारभारती नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:02 IST

वृत्तसंस्थेशी करार तोडण्याची दिली धमकी : ‘ते’ वृत्त राष्ट्रविरोधी असल्याचा केला आरोप; वृत्तसंस्थेची कृती सकारात्मक मूल्यांच्या विरोधात

नवी दिल्ली : चीनचे राजदूत सन वेडाँग यांची भारतावर टीका करणारी मुलाखत प्रसारित केल्याप्रकरणी प्रसारभारतीने प्रेस ट्रस्ट आॅफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी कराराचा फेरआढावा घेण्याचे ठरविले आहे. पीटीआयने दिलेले वृत्त राष्ट्रविरोधी आणि देशाच्या एकात्मतेस बाधा आणणारे असल्याचा आरोपही प्रसारभारतीने केला आहे.

प्रसारभारतीने पीटीआयला एक पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, तुम्ही प्रसारित केलेल्या बातमीत देशहिताच्या विरोधात आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या प्रादेशिक एकात्मतेला बाधा पोहोचली आहे. आता पीटीआयसोबतच्या कराराचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे. प्रसारभारती ही संस्था पीटीआयची वर्गणीदार आहे. पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. चीनच्या राजदूतांची मुलाखत प्रसारित केल्याने ही संस्था आता वादात सापडली आहे. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पीटीआयला ६.७५ कोटी रुपये वार्षिक वर्गणी देतो. दरम्यान, पीटीआयचे प्रमुख संपादक विजय जोशी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. चिनी राजदूतांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आली त्याचे वृत्तसंस्थेने समर्थन केलेआहे.

प्रसारभारती ही आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे नियंत्रण करणारी संस्था आहे. त्यांनी पीटीआयला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक प्रसारक म्हणून वृत्तसंस्थेची कृती या देशासाठी सकारात्मक मूल्यांच्या विरोधात आहे. प्रसारभारती कायदा १९९० च्या कलम १२ मध्ये ज्या मूल्यांचा उल्लेख आहे, त्यांची वृत्तसंस्थेने पायमल्ली केली आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला पीटीआयची सेवा सुरू ठेवण्यात स्वारस्य वाटत नाही. प्रसारभारतीच्या कायद्यान्वये सार्वजनिक सेवा प्रसारकाने त्याची कामे करताना देशाची एकता व अखंडता याला बाधा येईल, असे काही करू नये. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१७-१८ मध्ये त्यांची वर्गणी २५ टक्के कमी केली आहे. पीटीआयच्या मंडळात पत्रकारांचा समावेश असून, स्वतंत्र संचालक नाहीत. प्रसारभारतीला प्रतिनिधित्व नाही. प्रसारभारती पीटीआयला सर्वाधिक रक्कम देते.पीटीआयचे म्हणणे काय?पीटीआयने म्हटले आहे की, प्रसारभारतीची भूमिका आणि कराराचा फेरआढावा घेण्याचा विचार अन्याय्य आणि चुकीचा आहे.चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे.नाराजीचे कारण काय?पीटीआयने गत आठवड्यात चीनचे राजदूत वेडाँग यांची मुलाखत घेतली होती. गलवानमधील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेस भारतच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे करार आहेत.१९४७ मध्ये पीटीआयची नोंदणी झाली. वृत्तसंस्थेचे काम १९४९ मध्ये सुरूझाले. या वृत्तसंस्थेचे संचालक मंडळ असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रोजचे काम पाहतात.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन