शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सायको किलर! 2 तासात केली सहा जणांची हत्या, हरियाणामध्ये दहशतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 09:48 IST

हरियाणाच्या पलवलमध्ये सोमवारी रात्री दोन तासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याची घटना उघड झाली आहे.

ठळक मुद्देहरियाणाच्या पलवलमध्ये सोमवारी रात्री दोन तासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे या सहाही हत्या एकाचा पद्धतीने करण्यात आल्या आहेत.

पलवल- हरियाणाच्या पलवलमध्ये सोमवारी रात्री दोन तासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे या सहाही हत्या एकाचा पद्धतीने करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी सहा हत्येच्या या घटनेमुळे पलवलमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे. सगळ्या हत्या शहर पोलीस ठाण्यापासून 100 मीटरच्या अंतरावर झाल्या आहेत. एकाच व्यक्तीने या सगळ्या हत्या केल्याचं समजतं आहे. लोखंडी रॉडने डोक्यात घाव करून हत्या करण्यात आल्या आहेत. दोन तासात सहा हत्या करणाऱ्या या सायको किलरचा फोटो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या फोटोच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातो आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या सायको किलरच्या हातात लोखंडी रॉड स्पष्ट दिसतो आहे. सोमवारी रात्री झालेल्या या हत्याकांडानंतर शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

हत्या झालेल्या सहा जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे तर तीन पहारेकरी असल्याचं समजतं आहे. इतर दोन मृतांची ओळख अजून पटलेली नाही. महिलेची हत्या एका हॉस्पिटलजवळ करण्यात आली. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरांमधील लोकांची हत्या झाली. 5 मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलं आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे. सोमवारी रात्री उशिरा 2 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत अशा दोन तासात सहा हत्या झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जाते आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून