सायको किलर
By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:51+5:302015-02-21T00:49:51+5:30

सायको किलर
>सायको किलरची मानसोपचारतपासणी करणारनागपूर : तीन दिवसात लागोपाठ तीन जणांचे निघृर्णपणे खून करणारा सायको किलर राकेश हाडगे याला उद्या शनिवारी मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन त्याची मानसोपचार तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. हा आरोपी पाच दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत आहे. परंतु अद्यापही त्यांना खुनामागील हेतू जाणून घेण्यास यश आलेले नाही. त्याने पहिला खून १५ फेब्रुवारी रोजी केला. या घटनेच्या एक आठवड्या पूर्वीपासून त्याची मानसिक अवस्था बरी नव्हती. तो असामान्यपणे वागत होता. रक्ताने माखलेला मृतदेह पाहून त्याचे मानसिक समाधान होते होते. पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरताच त्याने लागोपाठ आणखी दोन खून केले. सावज हेरून विविध बहाण्याने निर्जन ठिकाणी नेऊन तो हे खून करीत होता. कळमना पोलिसांना तिन्ही मृतांची ओळख पटविण्यात अद्यापही यश आले नाही. मृतांची छायाचित्रे नजीकपासच्या राज्यातील पोलीस विभागाकडे रवाना करण्यात आलेली आहे.