अल्पसंख्यकांसाठी तरतूद केली दुप्पट
By Admin | Updated: February 12, 2015 00:04 IST2015-02-12T00:04:45+5:302015-02-12T00:04:45+5:30
दिल्लीत मानहानिकारक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले.

अल्पसंख्यकांसाठी तरतूद केली दुप्पट
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
दिल्लीत मानहानिकारक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदय अल्पसंख्यक समुदायासाठी द्रवले असून त्यांनी या समुदायासाठी असलेली सध्याची १५०० कोटींची तरतूद तीन हजार कोटी रुपयांवर नेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी रात्री घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास आणि वित्त महामंडळासाठी (एनएमडीएफसी) असलेली तरतूद दुप्पट म्हणजे १५०० कोटींवरून तीन हजार कोटी रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.