पोलिसांच्या अन्यायापासून संरक्षण द्या सराफ व्यापारी : पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30
सोलापूर :

पोलिसांच्या अन्यायापासून संरक्षण द्या सराफ व्यापारी : पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
स लापूर : सोन्या-चांदीचा व्यापार करीत असताना आम्हा सराफांना पोलिसांकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोट्या गुन्ाखाली अटक करून डांबून ठेवले जात आहे. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले असून आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी सराफांच्या वतीने पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चोरीच्या मालाबाबत साशंकता असल्यास आम्ही कसलाही व्यवहार करीत नाही. वेळप्रसंगी आम्ही योग्य ती सहकार्याची भावना दर्शवलेली आहे. पोलिसांना तपासकामी सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. असे असताना विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले हे सराफी व्यापार्यांना दमदाटी करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. दि.२२ जून २0१५ रोजी रामचंद्र सिद्धारूढ पोतदार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रामचंद्र पोतदार यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेऊन पी.एस. खटाणे व त्यांच्या सहकार्यांकडून अत्याचार करण्यात आले. चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व्यापार्यांनी घेतले नाहीत. मात्र त्यांना गुंतवण्याची भाषा पोलीस अधिकार्यांकडून होत आहे. खोट्या गुन्ात अडकवून प्रतिष्ठेला काळिमा फासला जात आहे. आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविलेला आहे. त्याचे फुटेज सदैव सादर करण्यास तयार आहोत. तरी पोलीस आयुक्तांनी सराफी व्यापार्यांवर होत असलेल्या अन्यायापासून संरक्षण द्यावे, खोटे गुन्हे नोंदवण्यात येऊ नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर किरण जोजारे, रामचंद्र पोतदार, प्रशांत जडे, राहुल गांधी, सिद्धाराम पोतदार, अनिकेत नरसिंगपूरकर, सुजितकुमार पोतदार, ऋषीकेश कुमठेकर, जयप्रकाश धुळेराव, इस्माईल मुल्ला आदी २0 जणांच्या सा आहेत. (प्रतिनिधी)