हिंमत असेल तर माहिती द्या

By Admin | Updated: October 23, 2014 04:31 IST2014-10-23T04:31:35+5:302014-10-23T04:31:35+5:30

परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे उघड झाली तर काँगे्रसचीच अडचण होईल, असे सांगणा-या भाजपाला आता काँग्रेसनेच आव्हान दिले आहे़

Provide information if you have the courage | हिंमत असेल तर माहिती द्या

हिंमत असेल तर माहिती द्या

नवी दिल्ली : परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे उघड झाली तर काँगे्रसचीच अडचण होईल, असे सांगणा-या भाजपाला आता काँग्रेसनेच आव्हान दिले आहे़ आम्हाला ब्लॅकमेल करू नका़ हिंमत असेल तर काळ्या पैसेवाल्यांची नावे उघड करून दाखवाच, असे आव्हान काँग्रेसने भाजपाला दिले़ काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अर्धसत्य आणि सोयीस्कर निवडक माहिती उघड करण्यापेक्षा भाजपाने सर्व माहिती उघड करावी, असेही काँगे्रसने म्हटले आहे़
परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे उघड झाली तर आमची नाही पण काँगे्रसचीच अडचण होईल, असे वक्तव्य मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते़ यावर बुधवारी काँग्रेस नेते अजय माकन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले़ काँगे्रसला अशा कुठल्याही धमक्यांमुळे ब्लॅकमेल केले जाऊ शकत नाही़ काँग्रेस पक्ष व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे़ काळ्या पैशाप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, असे आमचेही मत आहे़ पण केवळ सुडाच्या भावनेतून जनतेत अर्धसत्य माहिती पेरणे अयोग्य आहे़ भाजपाने काँगे्रसला ब्लॅकमेल करू नये़ त्यांच्याकडे नावे असतील तर
त्यांनी ती जाहीर करावी, असे माकन यावेळी म्हणाले़
काळा पैसा परदेशात लपविणाऱ्या ८०० जणांची नावे जाहीर न करता केवळ १३६ जणांचीच नावे भाजपा का पुढे करतोय, असा सवाल करीत काळ्या पैशाबाबत भाजपा लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँगे्रस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही टिष्ट्वटच्या माध्यमातून भाजपावर तोफ डागली़ अर्थमंत्र्यांनी लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यापेक्षा पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात ते तीन लाख रुपये कधी जमा करणार आहेत, ते सांगावे़ जनधन योजनेअंतर्गत लोकांसाठी ही दिवाळीची भेट ठरेल की पुन्हा २०१९ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे टिष्ट्वट त्यांनी केले़ अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष राजीव सातव यांनीही काळ्या पैसावाल्यांची नावे जाहीर करण्यापासून जेटलींना कुणी रोखले आहे, असा सवाल केला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Provide information if you have the courage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.