प्रकल्पांची चार दिवसात माहिती द्या
By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:22+5:302015-07-29T00:42:22+5:30
सुनील अग्रवाल: प्रकल्प समितीच्या बैठकीत निर्देश

प्रकल्पांची चार दिवसात माहिती द्या
स नील अग्रवाल: प्रकल्प समितीच्या बैठकीत निर्देशनागपूर : महापालिकेच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रस्तावित प्रकल्प, आर्थिक स्थिती काय आहे, याबाबतची सविस्तर माहिती ३१ जुलैपर्यंत लिखित स्वरूपात सादर करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी सोमवारी बैठकीत दिले. शहरातील प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात. तसेच विद्युत विभागाने सोलरची स्थिती, एलईडी दिवे, पथदिवे व ऊर्जासंदर्भात सविस्तर माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात ९ ऑगस्टपासून वृक्षलागवड मोहीम राबवावी, अशी सूचना उद्यान विभागाला केली. सर्व विभागाची माहिती प्राप्त झाल्यानंतर विकास कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीला उपसभापती राजेश घोडपागे, समितीचे सदस्य असलम खान, महेंद्र बोरकर, पल्लवी श्यामकुळे, स्वाती आखतकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगरयंत्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्याम चव्हाण, संजय जैस्वाल, सतीश नेरळ, दिलीप जामगडे, स्थावर अधिकारी डी.जी. जांभुळकर, उद्यान अधीक्षक सुधीर माटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)