शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सविरोधात निदर्शन : साध्वी प्रज्ञा भडकल्या, म्हणाल्या - भोपाळमध्ये 'गद्दारां'ची कमी नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 30, 2020 17:56 IST

देशात अशा लोकांविरोधत नियम तयार करायला हवेत आणि अशा लोकांना लगाम लागायला हवा : साध्वी प्रज्ञा (Bhopal, bjp, sadhvi pragya thakur)

ठळक मुद्देफ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या घटनेसंदर्भात राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, जगभरात निदर्शने होत आहेत.मॅक्रॉन यांनी केलेल्या टिप्पणीविरोधात भोपाळमध्ये गुरुवारी शेकडो लोकांनी निदर्शन केले.खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, "भोपाळमध्ये अशा 'गद्दारां'ची कमी नाही.

भोपाळ - फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या घटनेसंदर्भात राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, जगभरात निदर्शने होत आहेत. मॅक्रॉन यांनी केलेल्या टिप्पणीविरोधात भोपाळमध्ये गुरुवारी शेकडो लोकांनी निदर्शन केले. सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या निदर्शनांवरून भडकल्या आहेत. 

खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, "भोपाळमध्ये अशा 'गद्दारां'ची कमी नाही. हे लोक देश बर्बात करण्यात लागले आहेत. देशात अशा लोकांविरोधत नियम तयार करायला हवेत आणि अशा लोकांना लगाम लागायला हवा." एवढेच नाही, तर दहशतवादी कारवाया पसरवणारे लोक अधर्मी आहेत. केवळ फ्रान्सच नाही, तर संपूर्ण जगात जेथे-जेथे असे लोक आहेत, ते देश लोकांच्या संरक्षणासाठी कायदा तयार करतील, असेही साध्वी म्हणाल्या.

"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

साध्वी प्रज्ञा सींह यांनी प्रश्न उपस्थित केला, की "हे लोक चीनमध्ये का तोंड वर काढू शकत नाहीत? जे नियम चीन तयार करतो, त्याच नियमांवर या लोकांना चालावे लागते. भारतानेही असे नियम तयार करायला हवेत." एवढेच नाही, तर "दहशतवादी कोण असतो? हाच वर्ग का असतो? हा वर्ग जेथे-जेथे आहे, या अधर्मी लोकांना तेथे-तेथे शिक्षा मिळत आहे," असेही साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.

'नेहमी-नेहमी एकच समाज का आग लावतो' - यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की आगच लावावी. आपण आपल्या मान्यतांवर विश्वास ठेवा, मात्र, संपूर्ण जगावर तर हे थोपू शकत नाही. स्वतःप्रति दृढ रहा आणि इतरांप्रति उदार रहा. स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ठेवा'. रामदेव म्हणाले, ध्रुवीकरणाचे घृणास्पद राजकारण संपायला हवे. यावर लगाम लागायला हवा.'

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

'धार्मिक उन्मादामुळेच युद्ध होतात' - रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात. 'आजवर जगभरात झालेल्या लढायांचे सर्वात मोठे कारण हे धार्मिक उन्माद आहे. धार्मिक दंगे आहेत.' यावेळी, पैगंबर मोहम्मद, यशू ख्रिस्त, गुरुनानक देव जी, भगवान महावीर, बुद्ध, भगवान राम, कृष्ण, शिव, कुठल्याही महापुरुषाने धार्मिक कट्टरतेसंदर्भात भाष्य केले आहे? असा सवाल करत, कधीच नाही,' असे बाबा रामदेव म्हणाले. या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे, 'सर्व मानुष्य एकसारखेच आहेत. हिंसा तर अत्यंत दूरची गोष्ट, हे म्हणतात, की कधीही कुणाचे मन दुखवू नका. मग हा काय तमाशा सुरू आहे? कशासाठी निदर्शन होत आहे?'

"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ

टॅग्स :Franceफ्रान्सTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरMadhya Pradeshमध्य प्रदेश