शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सगळेच रस्ता अडवू लागल्यास कसं चालेल?; शाहीन बाग प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 17:18 IST

सीएए, एनआरसीच्या विरोधात दोन महिन्यांपासून शाहीन बाग परिसरात आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

ठळक मुद्देसीएए, एनआरसीविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बाग परिसरात आंदोलनआंदोलकांनी रस्ता अडवल्यानं वाहतुकीवर मोठा परिणामआंदोलनामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यानं रस्ते वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना आंदोलकांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या. लोकांना आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र प्रत्येकजण रस्त्यावर उतरु लागल्यास काय होईल, असा प्रश्न न्यायालयानं विचारला.शाहीन बागेतल्या आंदोलनाचा विषय जनजीवन ठप्प करण्याशी संबंधित असल्याचं न्यायालयानं याचिकेवरील सुनावणी दरम्यान म्हटलं. दिल्ली पोलिसांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देत न्यायालयानं या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी २४ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली. न्यायालयानं आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी वरिष्ठ वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांची नियुक्ती केली. शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्ता बंद असल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. लोकांना आपला आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. आम्ही त्या अधिकाराच्या विरोधात नाही. लोकशाहीत आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलन करण्यासाठी जंतरमंतरचा पर्याय उपलब्ध असल्याचं न्यायालयानं म्हटलं. यावेळी न्यायालयानं आंदोलकांना दिल्लीतल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे देण्याची अप्रत्यक्ष विनंती केली. दिल्लीत वाहतूक कोडींची मोठी समस्या आहे. तुम्हाला याची कल्पना आहे. प्रत्येक जण रस्त्यावर उतरू लागल्यास कसं चालेल?, असा प्रश्न न्यायालयानं विचारला.प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर आली आणि रस्ता रोखू लागली, तर काय होईल, याची आम्हाला चिंता वाटत असल्याचं न्यायालयानं सुनावणीवेळी म्हटलं. देशातल्या नागरिकांना आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र स्वातंत्र्यासोबतच प्रत्येक नागरिकाची काही कर्तव्यदेखील आहेत. अधिकार आणि कर्तव्यांमध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी