चोरीच्या आरोपामुळे सुरक्षारक्षकाची आत्महत्त्या
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:58+5:302015-02-15T22:36:58+5:30
नाशिक : मालकाने केलेला चोरीचा आरोप सहन न झाल्याने साहेबराव आत्माराम पगार यांनी शुक्र वारी (दि.१३) अशोकस्तंभाजवळ विष पिऊन आत्महत्त्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे़ याप्रकरणी त्यांच्या मुलाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात रमन गुलाटी आणि एल. गुलाटी यांच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे़ गुलाटी यांच्याकडे साहेबराव पगार हे सुरक्षारक्षक म्हणून कामास होते. गुलाटी यांच्या पाइपच्या गोडावूनवर पगार वॉचमन म्हणून कार्यरत असताना तेथे चोरी झाली होती. त्यामुळे गुलाटी यांनी पगार यांच्यावर चोरीचा आरोप लावला. तसेच पैसे आणून दे, नाही तर सर्व कुटुंबाला जेलमध्ये टाकीन, अशी धमकी दिली होती. हा चोरीचा आरोप सहन न झाल्यानेच वडिलांनी आत्महत्त्या केल्याचे निरंजन साहेबराव पगार याने फिर्यादीत म्हटले आहे़(प्रतिनिधी)

चोरीच्या आरोपामुळे सुरक्षारक्षकाची आत्महत्त्या
न शिक : मालकाने केलेला चोरीचा आरोप सहन न झाल्याने साहेबराव आत्माराम पगार यांनी शुक्र वारी (दि.१३) अशोकस्तंभाजवळ विष पिऊन आत्महत्त्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे़ याप्रकरणी त्यांच्या मुलाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात रमन गुलाटी आणि एल. गुलाटी यांच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे़ गुलाटी यांच्याकडे साहेबराव पगार हे सुरक्षारक्षक म्हणून कामास होते. गुलाटी यांच्या पाइपच्या गोडावूनवर पगार वॉचमन म्हणून कार्यरत असताना तेथे चोरी झाली होती. त्यामुळे गुलाटी यांनी पगार यांच्यावर चोरीचा आरोप लावला. तसेच पैसे आणून दे, नाही तर सर्व कुटुंबाला जेलमध्ये टाकीन, अशी धमकी दिली होती. हा चोरीचा आरोप सहन न झाल्यानेच वडिलांनी आत्महत्त्या केल्याचे निरंजन साहेबराव पगार याने फिर्यादीत म्हटले आहे़(प्रतिनिधी)