शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांचे संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 06:34 IST

राजेश्वरप्रसाद रॉय गृहनिर्माण मंडळाचे निवृत्त अभियंता आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी स्वकमाईच्या जागेवर २० खोल्यांचे विश्रामगृह अतिरिक्त उत्पन्नासाठी बांधले होते.

-डॉ. खुशालचंद बाहेती, नवी दिल्लीज्येष्ठ नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहावी आणि त्यांना सुरक्षित व सन्मानाने जगता यावे याची खात्री करणे हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. वृद्ध पालकांना त्रास देणाऱ्या मुलांना ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेतून काढून टाकले नाही तर ज्येष्ठ नागरिक कायद्याचा पराभव होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजेश्वरप्रसाद रॉय गृहनिर्माण मंडळाचे निवृत्त अभियंता आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी स्वकमाईच्या जागेवर २० खोल्यांचे विश्रामगृह अतिरिक्त उत्पन्नासाठी बांधले. राजेश्वर यांचा विवाहित मुलगा पत्नीसह वेगळा राहायचा. २०२१ मध्ये मुलाने पर्यायी जागा मिळेपर्यंत तात्पुरती विश्रामगृहातील एक खोली मागितली. नंतर त्याने आणखी २ खोल्यांवर अतिक्रमण केले.

नेमके काय घडले?

राजेश्वर यांनी खोली ताब्यात घेण्यावरून विचारले तेव्हा मुलाने त्यांना अडकविण्याची धमकी दिली. राजेश्वर यांनी याची पोलिसांत तक्रार केली. मुलानेही पत्नीशी गैरवर्तन केल्याची तक्रार केली.

राजेश्वर यांनी अर्ज दाखल करून मालमत्तेवरील मुलाचे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. यावर सुनेने  हिंसाचार कायद्याचा खटला दाखल केला. ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मुलाला मालमत्तेतून काढून टाकण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा आदेश कायम केला.

कुटुंब संस्थेत बदल 

बंगळुरू : भारतात कुटुंब संस्थेत वेगाने बदल होत आहेत आणि या बदलांचा केवळ कुटुंबांच्या रचनेवरच नव्हे तर कायदेशीर व्यवस्थेवरही खोलवर परिणाम होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांनी व्यक्त केले.

‘कुटुंब : भारतीय समाजाचा पाया’ या विषयावर दक्षिण विभागीय प्रादेशिक संमेलनाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शिक्षणाची उपलब्धता, वाढते शहरीकरण, वैयक्तिक आकांक्षा आणि शिक्षण घेणाऱ्या महिलांचे वाढते आर्थिक स्वातंत्र्य यासह अनेक घटकांमुळे हा बदल घडत आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या स्वअर्जीत मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या आणि वृद्ध पालकांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पाल्यांना मालमत्तेतून काढून टाकण्याच्या तरतुदींचा लाभ देण्यात आला नाही तर ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायद्याचा उद्देशच अपयशी ठरेल. -न्या. विक्रम नाथ आणि संदीप मेहता.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारी