शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

" कृषी विषयक विधेयकातील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारला १५ हजार गावांमधून प्रस्ताव.." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 13:17 IST

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकात अनेक त्रुटी, त्या दुर कराव्यात : भारतीय किसान संघाची भूमिका

ठळक मुद्देपंतप्रधान, कृषीमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करणार  आधारभूत किंमतीच्या खाली कोणालाही शेतीमाल खरेदी करताच येणार नाही असा कायदा हवा

राजू इनामदार-पुणे: केंद्र सरकारने केलेल्या कृषी विषयक कायद्यात काही त्रुटी आहेत. त्या दूर कराव्यात अशी आमची भूमिका आहे, मात्र त्यासाठी जाहीर विरोध वगैरे न करता आम्ही १५ हजार गावांमधून सरकारला या त्रुटी दूर करण्यासंबधी प्रस्ताव पाठवले आहेत, असे भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी सांगितले.राजस्थानस्थित चौधरी 'लोकमत' बरोबर बोलताना म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवरच भारतीय किसान संघ चालतो व केंद्र सरकारही त्याच विचारधारेचे आहे, मात्र त्यांचे काम वेगळे आहे व आमचे वेगळे. त्यामुळे मातृ संघटनेकडून त्याबाबत काहीही सांगितले जात नाही. जे योग्य वाटत नाही त्याला विरोध करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे.

भारतीय मजदूर संघाने कामगार विषयक दुरूस्त्यांना विरोध केल्याचे माहिती आहे असे स्पष्ट करून चौधरी म्हणाले, विरोध व्यक्त करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांनी जो प्रकार वापरला म्हणून आम्ही तसेच करायला हवे असे नाही.  किसान संघाला नक्की काय हवे आहे असे विचारले असता चौधरी म्हणाले, "शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कोणालाही व कुठेही विकण्याचा अधिकार मिळाला, पण त्यात त्याला त्याच्या मालाची आधारभूत किंमत मिळेल असे कुठेही नाही. बाहेरच्या बाजारात व्यापारी आता एकी करून त्याला ठकवू शकतात. म्हणून आधारभूत कि़मतीच्या खाली कोणालाही शेतीमाल खरेदी करताच येणार नाही असा कायदा व्हावा अशी आमची मागणी होती. शेतकऱ्याचा खरा फायदा त्यात आहे. आता बाजारपेठ खुली केली म्हणून त्याचे नुकसान थांबेल असे अजिबात नाही."केंद्र सरकारने हे विधेयक तयार करताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे अशी टीका करून चौधरी म्हणाले, "शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणी केंद्र व राज्य सरकारच्या पोर्टलवर करणे बंधनकारक असावे, शेतीशी संबधित सर्व दावे चालवण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावे अशा मागण्या किसान संघाने केल्या होत्या, मात्र त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. कृषी विषयक या तिनही विधेयकांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यात बदल व्हावा असे सरकारला सांगितले आहे."पण आता दुरूस्ती विधेयक मंजूर होऊन त्यावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तबही झाले आहे याकडे लक्ष वेधले असता चौधरी म्हणाले, "आत्ता मंजूर झाली तीसुद्धा कायद्यातील दुरूस्तीच होती. मग पुन्हा बदल करता येणारच नाही असे आहे का? किसान संघाचे ८० हजार गावांमध्ये संघटन आहे. कोरोनामुळे आम्हाला फक्त १५ हजार गावांमधूनच प्रस्ताव जमा करता आले. ते पाठवले आहेत. पंतप्रधान, कृषीमंत्री यांची पुन्हा भेट घेऊन चर्चा करणार आहे" 

टॅग्स :PuneपुणेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCentral Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी