पाल येथे उद्यानविद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव पाच सदस्यीक कमिटीची पाहणी : शासनाला अहवाल सादर
By Admin | Updated: March 10, 2016 00:26 IST2016-03-10T00:26:16+5:302016-03-10T00:26:16+5:30
जळगाव- पाल ता.रावेर येथे राज्याच्या कृषि मंत्रालयांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठांतर्गत एका कमिटीने पाल येथे नुकतीच पाहणी करून त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्याच्या कृषि मंत्रालयास सादर केला आहे.

पाल येथे उद्यानविद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव पाच सदस्यीक कमिटीची पाहणी : शासनाला अहवाल सादर
ज गाव- पाल ता.रावेर येथे राज्याच्या कृषि मंत्रालयांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठांतर्गत एका कमिटीने पाल येथे नुकतीच पाहणी करून त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्याच्या कृषि मंत्रालयास सादर केला आहे. राहुरी कृषि विद्यापीठाचे एकमेव उद्यानविद्या महाविद्यालय पुणे येथे आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता व इतर बाबी लक्षात घेता आणखी एक उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यासंबंधी कृषि मंत्रालयाने सूचना दिल्या. त्यानुसार तज्ज्ञांची कमिटी गठीत करण्यात आली. कमिटीचे प्रमुख महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.उन्मेक आहे. तर तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुदाम पाटील व इतर चार सदस्य या कमिटीमध्ये आहेत. १२८ हेक्टर जमीनपाल येथे उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. शासनाची १२८ हेक्टर जमीन या भागात उपलब्ध आहे. उद्यानविद्या महाविद्यालयात फळ झाडांचे प्रयोग, वसतीगृह, प्रयोगशाळा, सभागृह, वर्ग खोल्या, कर्मचारी व अधिकारी निवासस्थान असतील. या सर्व बाबींसाठी आवश्यक तेवढी जमीन किंवा क्षेत्र पाल येथे उपलब्ध आहे, अशी माहिती मिळाली. अहवाल सादरपाहणी करून कमिटीने आपला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल मंत्रालयास सादर झाला असून, शासन त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती मिळाली. कोट-पाहणी कमिटीने उद्यानविद्या महाविद्यालयाच्या स्थापनेसंबंधीचा आपला अहवाल शासनास सादर केला आहे. त्यातील बाबी स्पष्टपणे सांगता येणार नाहीत. अंतिम निर्णय शासनातर्फे घेतला जाईल. -डॉ.सुदाम पाटील, उद्यानविद्या महाविद्यालय पाहणी कमिटीचे सदस्य