तुळजापुरातून प्रचार प्रारंभ
By Admin | Updated: September 29, 2014 07:13 IST2014-09-29T07:13:06+5:302014-09-29T07:13:06+5:30
विधानसभा निवडणूक प्रचार मोहिमेतील काँग्रेसची पहिली जाहीर सभा मंगळवारी तुळजापूर येथे होणार आहे. १ सप्टेंबर रोजी मुंबईतील

तुळजापुरातून प्रचार प्रारंभ
मुंबई : विधानसभा निवडणूक प्रचार मोहिमेतील काँग्रेसची पहिली जाहीर सभा मंगळवारी तुळजापूर येथे होणार आहे. १ सप्टेंबर रोजी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून काँग्रेसने या मोहिमेचा शुभारंभ केला होता.
तुळजापुरात होणाऱ्या सभेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)