मोदी सरकारचे घोडेबाजाराला प्रोत्साहन

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:51+5:302015-02-11T23:19:51+5:30

नितीशकुमार यांचा आरोप

Promotion of Modi Government's horse market | मोदी सरकारचे घोडेबाजाराला प्रोत्साहन

मोदी सरकारचे घोडेबाजाराला प्रोत्साहन

तीशकुमार यांचा आरोप
नवी दिल्ली : बिहार राज्य विधानसभेत आपल्याला स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. मोदी सरकार राज्यपालांशी संगनमत करून बिहारमधील आमदारांच्या घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहे, असा स्पष्ट आरोप संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केला आहे.
बहुतांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा असणे स्वाभाविक आहे. बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे निर्णय घेण्यात विलंब लावत असल्याने नव्या सरकारच्या स्थापनतही अडचणी येत आहेत, असे नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार हे मंगळवारी सायंकाळी आपल्या १३० समर्थक आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी या १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर हजर केले. ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात विलंब लावला जात आहे, त्यावरून मोदी सरकारच्या वतीने आमदार फोडण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हेतू स्पष्ट आहे. त्यांना बहुमताचे सरकार स्थापन होऊ द्यायचे नाही. यामुळे घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळेल, असे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
यासंदर्भात तत्काळ कृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून नितीशकुमार पुढे म्हणाले, जेवढा उशीर होईल तेवढे राजकीय वातावरण खराब होत जाईल. राज्यात जे काही घडते आहे ते सर्व लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Promotion of Modi Government's horse market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.