जयललितांप्रकरणी सुनावणी लांबणीवर
By Admin | Updated: February 28, 2015 00:47 IST2015-02-28T00:47:38+5:302015-02-28T00:47:38+5:30
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बाजू मांडणारे सरकारी वकील पक्षपाती असल्याचा आरोप करीत खटल्याला स्थगिती देण्याची विनंती द्रमुकचे नेते के

जयललितांप्रकरणी सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बाजू मांडणारे सरकारी वकील पक्षपाती असल्याचा आरोप करीत खटल्याला स्थगिती देण्याची विनंती द्रमुकचे नेते के. अन्बाझगन यांनी याचिकेत केली असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ९ मार्चपर्यंत लांबणीवर टाकली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयात जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी खटला सुरू आहे. या याचिकेवर आम्ही अद्याप विचार केलेला नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठाने सुनावणी लांबणीवर टाकली.