स्मृती विरोधातील खटला लांबणीवर
By Admin | Updated: September 28, 2014 02:56 IST2014-09-28T02:56:09+5:302014-09-28T02:56:09+5:30
स्मृती इराणी यांच्याविरुद्ध त्यांनी बदनामी केल्याकरिता दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी पुढील वर्षी 28 फेब्रुवारीला करण्याचे दिल्लीच्या एका न्यायालयाने निश्चित केले आहे.

स्मृती विरोधातील खटला लांबणीवर
>नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ व विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध त्यांनी बदनामी केल्याकरिता दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी पुढील वर्षी 28 फेब्रुवारीला करण्याचे दिल्लीच्या एका न्यायालयाने निश्चित केले आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तक्रार दाखल केली होती.
मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट धीरज मित्तल यांनी याआधी इराणी यांना समन्स पाठवून न्यायालयात हजर राहण्याविषयी सांगितले होते. 2क् डिसेंबर 2क्12 रोजी जेव्हा गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल घोषित केले जात होते तेव्हा इराणी यांनी दूरदर्शनवर दिलेल्या मुलाखतीत निरुपम यांच्याविरुद्ध वक्तव्य केल्याचे त्यांचे म्हणणो आहे. त्याकरिता निरुपम यांनी विनाशर्त सार्वजनिक माफी मागण्याविषयीचे पत्रही पाठविले होते. मात्र, इराणी यांनी त्याला उत्तर दिले नाही. इराणी यांनीही निरुपम यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.