वाया जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प महापालिका: नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाकडून ६० लाख

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30

अहमदनगर: जलशुध्दीकरण प्रकल्पांत शुध्दतेच्या प्रक्रियेनंतर वाया जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला शासनाकडून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ८ लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. विळद येथे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Project for Wasted Water Projects Municipal Corporation: Under the Renewable Plan 60 lakhs from the Government | वाया जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प महापालिका: नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाकडून ६० लाख

वाया जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प महापालिका: नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाकडून ६० लाख

मदनगर: जलशुध्दीकरण प्रकल्पांत शुध्दतेच्या प्रक्रियेनंतर वाया जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला शासनाकडून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ८ लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. विळद येथे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका मुळा धरणातून पाणी उपसा करून नगरकरांना पाणी पुरवठा करते. विळद येथे महापालिकेचा जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. तेथे शुध्दतेची प्रक्रिया करताना दिवसभरात साधारणत: तीन लाख लिटर पाणी वाया जाते. गढळलेले हे पाणी जवळच्या ओढ्यात सोडले जाते. त्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी प्रकल्प तयार केला. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत त्यासाठी निधी देण्याची मागणी महापालिकेने केली. शासनाच्या हुडकोकडून नगर महापालिकेला त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ८ लाख रुपये महापालिकेला वर्गही करण्यात आले. प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने ई निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी एक निविदा अंतिम करत ती मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आली आहे.
.........
असा असेल प्रकल्प
विळद येथे महापालिकेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पात दररोज फिल्टर वॉश, ओव्हरफ्लोचे तीन लाख लिटर पाणी वाया जाते. जलशुध्दीकरण प्रकल्पाशेजारीच मोठा टॅँक बांधला जाणार असून त्यात जलशुध्दीकरणानंतरचे गढळलेले पाणी साठविले जाईल. काही काळ स्थिर झाल्यानंतर गाळ खाली बसतो. वरती राहिलेल्या नितळ पाण्याचा उपसा करून ते पुन्हा शुध्द केले जाईल. शुध्द झालेल्या या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात येईल. हा प्रकल्प राबविला तर मुळा धरणातून पाण्याचा उपसा करताना वापरली जाणारी वीज कमी लागेल. पर्यायाने महापालिकेला वीज बिल कमी येईल.

Web Title: Project for Wasted Water Projects Municipal Corporation: Under the Renewable Plan 60 lakhs from the Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.