महागड्या डिझेल गाड्यांच्या नोंदणीकरणावर बंदी
By Admin | Updated: December 17, 2015 00:31 IST2015-12-17T00:31:12+5:302015-12-17T00:31:12+5:30
राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली आणि एनसीआर भागांत २००० सीसी पेक्षा अधिक क्षमतेचे

महागड्या डिझेल गाड्यांच्या नोंदणीकरणावर बंदी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली आणि एनसीआर भागांत २००० सीसी पेक्षा अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या डिझेल एसयूव्ही आणि कारच्या नोंदणीकरणावर पुढील ३१ मार्च २०१६ पर्यंत बंदी घातली आहे.
सरन्यायाधीश तीरथसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ज्या व्यावसायिक वाहनांचे अंतिम मुक्कामाचे ठिकाण दिल्ली नाही, अशा वाहनांच्या दिल्लीतील प्रवेशावरही सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत चालणाऱ्या व्यावसायिक ट्रकवर लावण्यात आलेले पर्यावरण नुकसान भरपाई शुल्कही दुप्पट करण्याचे निर्देश या पीठाने दिले. २००५ पूर्वी नोंदणीकरण झालेल्या व्यावसायिक वाहनांना दिल्लीत प्रवेशबंदी असल्याचे आणि राजधानीत यापुढे केवळ सीएनजी टॅक्सींनाच परवानगी देण्यात येणार असल्याचे या पीठाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)