जयललिता समर्थकांकडून न्यायाधीशांचा निषेध
By Admin | Updated: October 2, 2014 00:49 IST2014-10-02T00:49:56+5:302014-10-02T00:49:56+5:30
जयललितांना शिक्षा ठोठावणारे न्या़ जॉन मायकेल डिकुन्हा यांच्या विरुद्ध चेन्नईत ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत़

जयललिता समर्थकांकडून न्यायाधीशांचा निषेध
चेन्नई : अपसंपदाप्रकरणी अण्णाद्रमुक सुप्रीमो ज़े जयललिता यांना चार वर्षाचा तुरुंगवास व तब्बल 100 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ जॉन मायकेल डिकुन्हा हे सध्या अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या रोषाचे बळी ठरत आहेत़ डिकुन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि बॅनर्स लावून ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात आह़े
जयललितांना शिक्षा ठोठावणारे न्या़ जॉन मायकेल डिकुन्हा यांच्या विरुद्ध चेन्नईत ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत़ कडी म्हणजे येथील महापालिकेने न्या़ डिकुन्हा यांच्यावर टीका करणारा ठराव संमत केला आह़े अण्णाद्रमुकचे काही वरिष्ठ नेते आणि तामिळनाडू फिल्म असोसिएशनने काही भागात बॅनर लावून ‘एक सामान्य माणूस परमेश्वराला शिक्षा कसा ठोठावू शकतो?’ असा सवाल केला आह़े जया टीव्ही या खासगी वाहिनीवर चर्चेत भाग घेणारे अनेक मान्यवरही न्या़ डिकुन्हा यांच्या विरोधात जहाल टीका करताना दिसत आहेत़
काही विचारवंत व तज्ज्ञांनी न्यायपालिकेवरील अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आह़े एका न्यायाधीशाविरुद्धची टीका निंदाजनक असून त्याला खतपाणी घालता कामा नये, असे त्यांचे मत आह़े
4अण्णाद्रमुक सुप्रीमो ज़े जयललिता यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी सहा दिवस वाढला आह़े कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठाने आज बुधवारी जयललितांच्या जामीन आणि शिक्षा निलंबित करणा:या याचिकेवरील सुनावणी 7 ऑक्टोबर्पयत पुढे ढकलली आह़े
4 अतिशय कडेकोट बंदोबस्तात उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन पीठाने जयललितांच्या अपसंपदा खटल्यावर अविलंब सुनावणी सुरू केली़ जयललितांचे वकील राम जेठमलानी यांनी गुन्हेगारी दंड संहितेच्या कलम 389 अंतर्गत अपील प्रलंबित असेर्पयत शिक्षा निलंबित ठेवण्याची, तसेच जामिनाची मागणी केली़
4तथापि विशेष सरकारी न्यायाधीश भवानी यांनी जयललितांच्या याचिकेला विरोध केला़ जयललितांनी ज्या दोषत्वाला निलंबित करण्याची मागणी केली गेली आहे, ते कायद्याला धरून नसल्याचे ते म्हणाले.
4त्यांनी जयललितांच्या जामीन अर्जालाही विरोध केला़ संक्षिप्त सुनावणीनंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी 7 ऑक्टोबर्पयत पुढे ढकलली़
निदर्शने, आत्महत्या सुरूच; आणखी एकाचा मृत्यू
जयललितांना शिक्षा ठोठावल्यामुळे नैराश्याने पछाडलेल्या लोकांचे आत्महत्या सत्र अजूनही थांबलेले नाही़ तीन दिवसांपूर्वी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा:या 55 वर्षीय शेतक:याचा बुधवारी अखेर मृत्यू झाला़
जयललितांना कोर्टाने शिक्षा ठोठावताच नागपट्टणमनजीकच्या ओरकुती गावातील या शेतक:याने विष प्राशन केले होत़े याचसोबत जयललितांच्या शिक्षेनंतर आत्महत्या वा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूला कवटाळणा:यांची संख्या 19 झाली आह़े आज पाचव्या दिवशीही चेन्नई आणि राज्याच्या विविध भागांत अण्णाद्रमुक कार्यकर्ते, समर्थकांनी निदर्शने केली़