पाच रुपये वेतनवाढीचा मजुरांकडून निषेध
By Admin | Updated: May 3, 2016 01:29 IST2016-05-03T01:29:21+5:302016-05-03T01:29:21+5:30
मनरेगाच्या मजुरीत केवळ पाच रुपये वेतनवाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ लातेहारच्या मनिका गट क्षेत्रातील ग्राम स्वराज मजदूर संघांच्या मजुरांनी वेगवेगळ्या

पाच रुपये वेतनवाढीचा मजुरांकडून निषेध
लातेहार (झारखंड) : मनरेगाच्या मजुरीत केवळ पाच रुपये वेतनवाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ लातेहारच्या मनिका गट क्षेत्रातील ग्राम स्वराज मजदूर संघांच्या मजुरांनी वेगवेगळ्या लिफाफ्यांमध्ये पाच रुपये टाकून ते कामगारदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या लिफाफ्यात एक पत्रही असून त्यात केवळ पाच रुपये वेतनवाढ तसेच केंद्र सरकारकडे मजुरांना देण्यास निधी नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. झारखंड सरकार किमान मजुरी २१२ देत असून केंद्र सरकारला त्याची बरोबरी करीत निश्चित वाढ करता आली असती.
१७ राज्यांमध्ये पाच
रुपयांपेक्षाही कमी वाढ
मनरेगाच्या वेतनात १७ राज्यांमध्ये पाच रुपयांपेक्षाही कमी वाढ केली असल्यामुळे आम्ही सुदैवी आहोत. ओडिशातील कामगारांची भरभराट झालेली दिसून येते, कारण त्यांच्यात वेतनात कोणतीही वाढ केली गेलेली नाही. केंद्राचा खर्चही जास्त असल्याने सरकारला पैशाची अधिक गरज आहे. हे घेत मनरेगाच्या कामगारांनी एकजुटीने पाच रुपये वेतनवाढ परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशातून सरकारला कंपन्या, मित्र व कर्मचाऱ्यांना खूष करता येईल, असे या पत्रामध्ये उपरोधिक सूरात म्हटले.