इंदिरानगरला वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: May 28, 2014 01:38 IST2014-05-28T00:22:08+5:302014-05-28T01:38:37+5:30
वृक्ष उन्मळले : पाणी साचून वाहतूक कोंडी

इंदिरानगरला वीजपुरवठा खंडित
वृक्ष उन्मळले : पाणी साचून वाहतूक कोंडी
इंदिरानगर : दुपारच्या वादळी पावसाने इंदिरानगर परिसरातही वृक्षांची पडझड झाल्याने अनेक ठिकाणच्या वीजतारा तुटल्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित असल्याने इंदिरानगर परिसरात अंधाराचे साम्राज्य होते.
वादळीवार्यासह रोहिणी नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने इंदिरानगर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. राजसारथी सोसायटी, विनयनगरच्या हनुमान मंदिराजवळ, छान हॉटेल, चार्वाक चौक व रथचक्र चौकात वादळीवार्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. काही झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक रस्त्यांवरच झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
मंुबई नाका ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपर्यंतच्या समांतर रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. सुचेतानगर, गजानन महाराज मंदिर, मोदकेश्वर मंदिरसह अनेक चौकांमध्ये पाण्याचे तळे साचले होते. राजसारथी सोसायटीसमोरील जाहिरातीचा फलक वादळीवार्याने कोसळला. सदरचा फलक अपार्टमेंट वा रस्त्यावर कोसळला असता तर मोठी दूर्घटना घडली असती. परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता.