जेल परिसर मर्यादेत घट विकासाला गती : प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:39+5:302015-07-10T23:13:39+5:30

सोलापूर : शहरातील जिल्हा कारागृहाच्या (जेल) परिसर मर्यादेत घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यामुळे शहर विकासासाठी लादलेले निर्बंधही उठवण्यात आले आहेत़ आ़ प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडून आवाज उठवला होता़

Progress in Progress: Praniti Shinde's efforts to achieve success | जेल परिसर मर्यादेत घट विकासाला गती : प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

जेल परिसर मर्यादेत घट विकासाला गती : प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

लापूर : शहरातील जिल्हा कारागृहाच्या (जेल) परिसर मर्यादेत घट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यामुळे शहर विकासासाठी लादलेले निर्बंधही उठवण्यात आले आहेत़ आ़ प्रणिती शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडून आवाज उठवला होता़
शासन निर्णयाने हिवाळी अधिवेशनात आ़ प्रणिती शिंदे यांनी जेल परिसरास बांधकाम आणि विकासाला अडसर ठरणारी परिसर मर्यादा घटवण्यात यावी़ नॅशनल जेल मॅन्युअलप्रमाणे ती लागू करावी, अशी मागणी केली होती़ विधिमंडळातील सर्वच आमदारांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मार्च पूर्वी मर्यादेची अट शिथिल करण्याचे मान्य केले होते़ यासंदर्भात मर्यादा घटवलेला शासन आदेश जारी करण्यात आला आहे़ या आदेशामुळे मध्यवर्ती कारागृह १५० मीटर, जिल्हा कारागृह १०० मीटर, तालुका कारागृह ५० मीटरपर्यंत परिसर मर्यादा घटवण्यात आली आहे़
सोलापूर शहरात जेलरोड, किडवाई चौकाजवळील जिल्हा कारागृहाच्या परिसरात ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम व विकासासाठी निर्बंध लादण्यात आले होते़ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कारागृह असल्यामुळे त्याच्या ५०० मीटर परिघातील विकासाला खीळ बसली होती़ याचा शहराच्या विकासावर अनिष्ट परिणाम होणार होता़ याकडे आ़ प्रणिती शिंदे यांनी शासनाचे लक्ष वेधले़ (प्रतिनिधी)

इन्फो --
या होत्या मागण्या
* शहरातील कारागृहे शहराबाहेर हटवणे़
* क्षमतेइतकेच कैदी कारागृहात ठेवणे़
* कारागृह परिसर मर्यादा घटवणे़

कोट -
कारागृहासभोवतालच्या ५०० मीटर अंतरामध्ये बांधकाम आणि विकासकामे करण्याचे निर्बंध लादल्याने त्या परिसरातील नागरिक हवालदिल झाले होते़ शहराच्या विकासावर या कायद्याचा थेट परिणाम झाला होता़ त्यामुळे कायदा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिला़
- आ़ प्रणिती शिंदे

Web Title: Progress in Progress: Praniti Shinde's efforts to achieve success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.