सत्यशोधक सेवा संघाच्यावतीने कुरूंदवाडमध्ये कार्यक्रम

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:17+5:302014-05-12T19:48:17+5:30

Program in Kurundwad by Satyashodhak Seva Sangh | सत्यशोधक सेवा संघाच्यावतीने कुरूंदवाडमध्ये कार्यक्रम

सत्यशोधक सेवा संघाच्यावतीने कुरूंदवाडमध्ये कार्यक्रम

>कुरूंदवाड : येथील सत्यशोधक बहुउद्देशीय सेवा संघाच्यावतीने बुधवारी (दि.१४) बहुउद्देशीय समर शिबीर व भगवान बुद्ध, छ. संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष ममतेश आवळे यांनी दिली.
येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात दिवसभरात योगासने व महत्व, मन व आरोग्य, ह्रदय व तान, सत्यसोधकांचे सामाजिक कार्य व सद्य स्थिती, जादूचे प्रयोग, अंधश्रद्धा निमृर्लन, स्त्री-भ्रूण हत्या, कामगार चळवळ व समस्या, कायदा व समाज आदी विषयावर विविध वक्त्यांची भाषणे होणार आहेत. तरी या शिबीराचा शहर वासियांनी लाभ घ्यावे, असे आवाहनही आवळे यांनी केले. यावेळी रूपेश जगताप, रामदास आवळे, शशिकांत पाटील, सुभाष आवळे, अंजना गायकवाड, राजाराम गायकवाड, धनपाल जगताप, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Program in Kurundwad by Satyashodhak Seva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.