यंदा होणार 250 लाख टन साखरेचे उत्पादन
By Admin | Updated: September 18, 2014 02:41 IST2014-09-18T02:41:36+5:302014-09-18T02:41:36+5:30
कमी पाऊस आणि ऊस लागवडीचे क्षेत्र कमी झाले असले तरी यंदाच्या गळीत हंगामात (2क्14-15) साखरेचे उत्पादन 225-25क् लाख टनादरम्यान होईल, असा अंदाज आहे.

यंदा होणार 250 लाख टन साखरेचे उत्पादन
नवी दिल्ली : कमी पाऊस आणि ऊस लागवडीचे क्षेत्र कमी झाले असले तरी यंदाच्या गळीत हंगामात (2क्14-15) साखरेचे उत्पादन 225-25क् लाख टनादरम्यान होईल, असा अंदाज आहे.
साखर कारखान्यांची संघटना असलेल्या इंडियन शुगर मिल असोसिएशनने (इस्मा) म्हटले आहे की, उपग्रहामार्फत मिळालेल्या छायाचित्रनुसार यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र 52.94 लाख हेक्टर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त लागवड क्षेत्र 1 टक्क्याने कमी झाले आहे. पावसाचा लहरीपणा आणि त्यामुळे होणा:या परिणामांचा अंदाज बांधणो कठीण आहे; परंतु 2क्14-15 च्या हंगामात 225 ते 25क् लाख टनादरम्यान साखरेचे उत्पादन होईल. साखर उत्पादनाच्या अग्रीम अंदाजाबाबतचा आढावा ऑक्टोबर 2क्14 मध्ये घेणार आहे.
ऑक्टोबरपासून सुरू होणा:या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन 253 लाख टन होईल, असा अंदाज इस्माने व्यक्त केला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस लागवड क्षेत्र वाढल्याच्या आधारावर इस्माने हा अंदाज व्यक्त केला होता.
महाराष्ट्रात 93 लाख टन उत्पादन
ताज्या अंदाजानुसार या वर्षी महाराष्ट्रातातील ऊस लागवडीचे क्षेत्र 1क्.14 लाख हेक्टर असून गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढले आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणा:या गळीत हंगामात 93 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातील ऊस लागवडीचे क्षेत्र 8 टक्क्यांनी कमी झाल्याने लागवड क्षेत्र 23.क्7 लाख हेक्टर आहे. उत्तर प्रदेशात 8 टक्क्यांनी घट होऊन साखरेचे उत्पादन 6क् लाख टन होईल, असा अंदाज आहे.
कर्नाटकातील ऊस लागवडीचे क्षेत्र 4.9 लाख हेक्टर असून मागील वर्षाच्या तुलनेत लागवड क्षेत्र 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे यावर्षी 7 टक्क्यांनी वाढ होऊन साखरेचे उत्पादन 44.5 लाख टन होईल.
इस्माच्या अंदाजानुसार 2क्14-15 च्या गळीत हंगामात गुजरातमध्ये 12 लाख टन, आंध्र प्रदेशात 1क् लाख टन, बिहार, पंजाब आणि हरियाणा आदी राज्यात मागील वर्षाइतकेच साखरेचे उत्पादन होईल.
4साखर कारखान्यांच्या वित्तीय स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून कच्च्या साखरेच्या निर्यातीवरील प्रोत्साहन सवलत 2क्14-15 मध्येही कायम ठेवावी, असे आवाहन इस्माने सरकारला केले आहे.
4इथेनॉल तयार करण्यासारख्या पर्यायांवरही विचार करावा, जेणोकरून साखर कारखान्यांना शेतक:यांना उसाचे बिल चुकते करता येईल.
42क्13-14 मध्ये साखर कारखान्यांनी 21.1 लाख टन साखर निर्यात केली होती. त्यात 55 टक्के कच्ची आणि उर्वरित शुद्ध साखर आणि निर्यात प्रोत्साहन योजनेतील 7 लाख टन साखरेचा समावेश होता. प्रोत्साहन योजनेतहत सरकार प्रति टन 3,3क्क् रुपयांची सबसिडी देते.