शेळ्या विकून शौचालय बांधणा-या वयस्कर आजीचे मोदींकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 21:48 IST2016-02-21T21:07:23+5:302016-02-21T21:48:18+5:30
येथील धामतरी जिल्ह्यातील एका १०४ वर्षीय आजीने आपल्याकडे असलेल्या शेळ्या विकून शौचालयाचे बांधकाम करुन घेतले.या आजीचे येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र

शेळ्या विकून शौचालय बांधणा-या वयस्कर आजीचे मोदींकडून कौतुक
ऑनलाइन लोकमत
छत्तीसगड, दि. - येथील धामतरी जिल्ह्यातील एका १०४ वर्षीय आजीने आपल्याकडे असलेल्या शेळ्या विकून शौचालयाचे बांधकाम करुन घेतले.या आजीचे येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक करत हे एक बदलत्या भारताचे प्रतिक असल्याचे सांगितले.
कुंवरबाई असे या आजीने नाव असून त्या धामतरी जिल्ह्यातील कोटाभर्री गावच्या रहिवाशी आहेत. येथील 'Rurban Mission' च्या माध्यमातून हागणदारी मुक्त गाव करण्याच्या संकल्पनेचा धडा घेत शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.
राजनांदगाव येथील अबांगड चौकी आणि छुरियाच्या विकास कामांअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी कुंवरबाई आजींचा सत्कार करण्यात आला.
१०४ वर्षीय आजीच्या रुपाने एक रिमोट गावात राहतो. या आजीने कोणताही टीव्ही पाहिला नाही किंवा पेपर वाचला नाही. परंतु स्वच्छ भारत मिशनचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांनी शौचालय बांधले. यासाठी त्यांनी स्वत:च्या शेऴ्या विकल्या. तसेच शौचालय बांधण्यासाठी इतरांना प्रोत्साहन दिले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आजीचे कौतुक केले.