मिरवणुकीने धोत्रा यात्रेस सुरुवात

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30

गोळेगाव : तालुक्याचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. यात्रा ६ मार्चपर्यंत राहील. प्रतिवर्षाप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर महाराज यांचा सकाळी १० वा. अभिषेक करण्यात आला व पूजा करण्यात आली. सायंकाळी श्रींच्या पालखीचे पूजन करून गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ७ वा. श्री सिद्धेश्वर टेकडीवर आतषबाजी करण्यात आली.

The procession started by Dhotra yatra | मिरवणुकीने धोत्रा यात्रेस सुरुवात

मिरवणुकीने धोत्रा यात्रेस सुरुवात

ळेगाव : तालुक्याचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. यात्रा ६ मार्चपर्यंत राहील. प्रतिवर्षाप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी श्री सिद्धेश्वर महाराज यांचा सकाळी १० वा. अभिषेक करण्यात आला व पूजा करण्यात आली. सायंकाळी श्रींच्या पालखीचे पूजन करून गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ७ वा. श्री सिद्धेश्वर टेकडीवर आतषबाजी करण्यात आली.
महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र धोत्रा येथे विविध गावाहून दिंड्या व भजनीमंडळी दाखल झाली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र धोत्रा दुमदुमून गेले. परिसरासह अनेक जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने धोत्रा येथे श्रींच्या दर्शनासाठी आले होते. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावर्षी यात्रेत फारच कमी व्यावसायिक आलेले आहेत. यात्रा अर्धीअधिक भरली आहे. वातावरण पाहून व्यावसायिक येतील असे वाटत आहे.
यात्रेत फिरते चित्रपटगृह, सर्कस, खानावळी, हॉटेल्स, खेळण्याची दुकाने, संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटली आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: The procession started by Dhotra yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.