१९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरु चौकशीला वेग : अशोक लाडवंजारीसह तिघांचे प्रस्ताव निकाली

By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:36+5:302016-02-03T00:28:36+5:30

जळगाव : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जळगाव व जामनेर तालुक्यातील पाठविण्यात आलेल्या २५ पैकी १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह तिघांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

The process of deportation of 19 people started at the start of the inquiry: Three proposals including Ashok Ladanwari | १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरु चौकशीला वेग : अशोक लाडवंजारीसह तिघांचे प्रस्ताव निकाली

१९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरु चौकशीला वेग : अशोक लाडवंजारीसह तिघांचे प्रस्ताव निकाली

गाव : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जळगाव व जामनेर तालुक्यातील पाठविण्यात आलेल्या २५ पैकी १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह तिघांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पोलीस स्टेशनमार्फत हद्दपारीचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. अपर पोलीस अधीक्षकांकडून हे प्रस्ताव कारवाईसाठी प्रातांधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत असतात. त्यानंतर चौकशी करून फेरचौकशीसाठी ते पोलीस उपअधीक्षकांकडे पाठविण्यात येत असतात. प्रातांधिकारी अभिजित भांडे यांच्याकडे गेल्या ११ महिन्यांपासून १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात पोलीस उपअधीक्षकांकडे सात जणांची चौकशी सुरु झाली आहे. तर प्रातांधिकारी यांच्याकडे १२ जणांची चौकशी सुरु आहे.

तिघांचे प्रस्ताव काढले निकाली
प्रातांधिकारी यांनी आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावानंतर तीन जणांचे प्रकरणे निकाली काढले आहेत. यात भाजपाचे माजी महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, उल्हास साबळे व अशपाक पिंजारी यांचा समावेश आहे. यांच्यासह अन्य तीन जणांचे प्रस्ताव निकाली काढण्याची प्रक्रिया सुरु आहे.

इन्फो-
यांच्या हद्दपारीच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरु
जिल्हा प्रशासनातर्फे भोलासिंग बावरी (रा.तांबापूरा), खुशाल उर्फ काल्या मराठे (रा.रामेश्वर कॉलनी), आकाश विश्वे (रा.सुप्रिम कॉलनी), जगतसिंग बावरी (रा.तांबापूरा), केदार भुसारी (रा.बळीरामपेठ), शेख हर्षद (रा.श्रीरामपेठ, जामनेर), अजय गारूंगे (रा.तांबापूरा), शराफत पठाण, (रा.बिस्मील्ला नगर, जामनेर), आकाश बागडे (रा.संजय गांधी नगर, जळगाव), अक्षय जावळे (रा.गुरुनानक नगर, जळगाव), फिरोज पठाण (रा.गेंदालाल मिल), रुपेश कोळी (रा.राधाकृष्ण नगर, जळगाव), भूषण उर्फ जिगर बोंडारे (रा.उमाळा, ता.जळगाव), गजानन बाविस्कर, राजेंद्र गोसावी (रा.हरि विठ्ठल नगर), सुनील भोई (रा.हरि विठ्ठल नगर), दीपक पाटील (रा.खोटे नगर), ललित कोल्हे (रा.कोल्हेनगर, जळगाव), विवेक ठाकरे (रा.देवेंद्र नगर, जळगाव) यांचा हद्दपारीची प्रक्रिया सुरु केली आहे.

कोट
कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या १९ जणांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरु आहे. तर तीन प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत.
अभिजित भांडे, प्रातांधिकारी, जळगाव.

Web Title: The process of deportation of 19 people started at the start of the inquiry: Three proposals including Ashok Ladanwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.