प्रो कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचे अपघातात निधन
By Admin | Updated: April 29, 2017 16:24 IST2017-04-29T16:13:48+5:302017-04-29T16:24:21+5:30
मॉडेल-अभिनेत्री तसेच प्रो कबड्डी लीगची प्रसिद्ध अँकर सोनिका चौहानचे शनिवारी रस्ते अपघातात निधन झाले.

प्रो कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचे अपघातात निधन
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 29- मॉडेल-अभिनेत्री तसेच प्रो कबड्डी लीगची प्रसिद्ध अँकर सोनिका चौहानचे शनिवारी रस्ते अपघातात निधन झाले. कोलकाताच्या लेक मॉलजवळ पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी सोनिकासोबत तिचा मित्र विक्रम चॅटर्जी होता. विक्रम कार चालवत होता. रासबेहाही अॅव्हेन्युजवळ त्यांच्या टोयोटा कोरोला कारने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक देऊन गाडी फुटपाथवर चढली.
गाडीच्या धडकेच्या आवाजाने आसपासच्या नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोघांना गाडीबाहेर काढले. सोनिका आणि विक्रम दोघांना जवळच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केले. विक्रमच्या डोक्याला मार लागला आहे.
त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला पण पुन्हा त्रास सुरु झाल्याने त्याला दुस-या रुग्णालयात दाखल केले. विक्रम चॅटर्जी बंगाली अभिनेता आहे. सोनिका टॉपची मॉडेल होती. स्पोटर्स अँकर म्हणून तिने अलीकडे नाव कमवायला सुरुवात केली होती. कोलकाता शिवाय मुंबईतही ती काम करत होती. सोनिका मिस इंडियाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.