ेएसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बक्षीस वितरण

By Admin | Updated: April 30, 2016 01:37 IST2016-04-30T01:37:10+5:302016-04-30T01:37:10+5:30

जळगाव- श्रमसाधना ट्रस्टच्या बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात २६ रोजी वार्षिक क्रीडा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात झाला. आंतर महाविद्यालय, आंतर विभागीय व आंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडूंचा सत्कार झाला. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन संघात २८८, आंतर विभागीय संघात ८० व आंतर विद्यापीठ संघात १७, अश्वमेध क्रीडा संघात २ आणि वार्षिक क्रीडा महोत्सवात ८५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी प्राचार्य डॉ.के.एस.वाणी, शैक्षणिक संचालक प्रा.डॉ.एस.पी.शेखावत, व्यवस्थापकीय संचालक प्रा.डॉ.एस.आर.सुरळकर, व्यवस्थापन समिती सदस्य बी.सी.कच्छवा, डॉ.पी.व्ही.ठाकरेे, जे.बी.सिसोदिया उपस्थित होते. क्रीडा प्रकारांमध्ये, स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा मान्यवरांच्याहस्ते प

Prize Distribution in CSS BT Engineering College | ेएसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बक्षीस वितरण

ेएसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात बक्षीस वितरण

तपूर : केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपात केल्याच्या निर्णयाचे सिटूने निषेध केला असून, हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाच्या १६ फेब्रुवारीच्या बैठकीत अंतरिम व्याजदर ८.८ टक्के करण्याची शिफारस एकमताने करण्यात आली होती. ती शिफारस डावलून अर्थमंत्री अरु ण जेटली यांनी ८.७ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. वास्तविक पाहता व्याजदर ठरविण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला आहे. त्यास फक्त मान्यता देण्याचे काम अर्थमंत्र्यांचे काम आहे, परंतु अर्थमंत्र्यांनी कामगार विरोधी भूमिका घेतल्याने सिटूच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. व्याजदर कपातीचा निर्णय मागे न घेतल्यास सिटूच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सिटूच्या वतीने सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, कल्पना शिंदे, भूषण सातळे, तुकाराम सोनजे, साधना झोपे, संजय पवार, गौतम कोंगळे आदिंनी भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)

फोटो, आर फोटोवर २८ पीएफ नावाने सेव्ह
फोटोओळी -
व्याजदर कपातीच्या निर्णयाविरोधात सिटूच्या वतीने भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांना निवेदन देताना सिटूचे सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, कल्पना शिंदे, भूषण सातळे, तुकाराम सोनजे, साधना झोपे, संजय पवार, गौतम कोंगळे आदि.

Web Title: Prize Distribution in CSS BT Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.