प्रियंका मुखर्जीचे कपडे तपासाधिकार्यांनी ओळखले आत्महत्या प्रकरण : सरतपासणी पूर्ण; २६ जुलैपासून उलटतपासणी
By Admin | Updated: July 13, 2016 23:12 IST2016-07-13T23:12:19+5:302016-07-13T23:12:19+5:30
जळगाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात बुधवारी सरकार पक्षातर्फे तपासाधिकार्यांची सरतपासणी पूर्ण झाली. बचावक्षातर्फे त्यांच्या उलटतपासणीला २६ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. सरतपासणीत तपासाधिकार्यांनी प्रियंका मुखर्जीचे कपडे ओळखले. याशिवाय त्यांनी तपासाकामाचे वर्णन सरतपासणीत न्यायालयाला सांगितले.

प्रियंका मुखर्जीचे कपडे तपासाधिकार्यांनी ओळखले आत्महत्या प्रकरण : सरतपासणी पूर्ण; २६ जुलैपासून उलटतपासणी
ज गाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात बुधवारी सरकार पक्षातर्फे तपासाधिकार्यांची सरतपासणी पूर्ण झाली. बचावक्षातर्फे त्यांच्या उलटतपासणीला २६ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. सरतपासणीत तपासाधिकार्यांनी प्रियंका मुखर्जीचे कपडे ओळखले. याशिवाय त्यांनी तपासाकामाचे वर्णन सरतपासणीत न्यायालयाला सांगितले.प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणी बुधवारी न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात या प्रकरणाचे तपासाधिकारी आर.के. नगराळे यांची जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. सरतपासणीत नगराळे यांनी, प्रियंकाचे कपडे व तिन्ही संशयित आरोपी विद्यार्थिनींना ओळखले. प्रियंकाने ज्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता; ती ओढणी पंचनाम्यावेळी जप्त करण्यात आली होती. याशिवाय महाविद्यालयातील तपासकाम पूर्ण झाल्यानंतर पिम बंगाल राज्यातील पुरुलिया या प्रियंकाच्या मूळ गावी जाऊन तेथूनही काही माहिती संकलित केली होती, असे आर.के. नगराळे यांनी सरतपासणीत सांगितले. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके यांनी तर बचावपक्षातर्फे ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे कामकाज पाहत आहेत.