शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

स्मृती इराणींचा पराभव करण्यासाठी प्रियांका गांधींची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 08:06 IST

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या ...

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्या आहेत. काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले असले तरी, अमेठी आणि रायबरेलीमध्ये प्रियांका स्वतः निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या भूमिकेत आहेत.प्रियांका सध्या दररोज अमेठी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भेटी देत आहेत या भागात वर्चस्व असलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. तसेच, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची अमेठीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भूपेश बघेल यांची रायबरेलीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

नेमके काय करणार? हे दोन नेते कोणतीही निवडणूक सभा घेत नाहीत तर, पडद्याआडून निवडणुकीचे व्यवस्थापन बघत आहेत. किशोरीलाल शर्मा यांना उमेदवार बनवण्यामागे काँग्रेसची रणनीती अशी आहे की, स्मृती इराणींना पराभूत करून त्यांना संदेश द्यायचा आहे की, या निवडणुकीत एका छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याने केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला. त्यामुळे प्रियांका यांनी पुढील १३ दिवस तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप राहुल विरोधात खोटे बोलण्यात गुंतलेलीप्रियांका गांधी यांनी आरोप केला की, भाजपची संपूर्ण यंत्रणा राहुल गांधींविरोधात खोटे पसरवण्यात गुंतलेली आहे. भाजप धर्म, जात आणि मंदिर-मशिदींबद्दल बोलतो, पण लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर बोलत नाही. भाजपला राज्यघटना बदलायची आहे, पण निवडणुकीत याचा त्रास सहन करावा लागेल, हे लक्षात आल्यावर त्यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

लोकांना वाटते की त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी, त्यांना उपाय हवा आहे. सरकारने वाढलेली बेरोजगारी, महागाई दूर करण्यासाठी काय केले हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. मी पंतप्रधानांना बेरोजगारीवर बोलण्याचे आव्हान देते. बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे.- प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीamethi-pcअमेठीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधी