शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

प्रियांका गांधींना धक्काबुक्की, फरपटत नेले पाेलिसांच्या गाडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 06:30 IST

महागाईविरोधात काँग्रेसचे रस्त्यावर महाआंदाेलन. महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. संसद सदस्यांचा मोर्चा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही यात थोड्या वेळासाठी सहभागी झाल्या होत्या.

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यांवर काँग्रेसने शुक्रवारी तीव्र आंदोलन केले. त्यात सहभागी झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सरचिटणीस प्रियांका गांधी यांना महिला पोलिसांनी अक्षरश: ओढत, फरपटत ताब्यात घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात महिला पोलीस प्रियांका यांना जबरदस्तीने वाहनात बसविताना, धक्काबुक्की करताना दिसत आहेत. 

महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. संसद सदस्यांचा मोर्चा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही यात थोड्या वेळासाठी सहभागी झाल्या होत्या.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सदस्यांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनपर्यंत मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना मध्येच रोखून ताब्यात घेतले. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे ठरविले होते. प्रियांका गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींसाठी मात्र महागाई नाही. त्यांनी काही लोकांना देशाची संपत्ती दिली आहे. राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई यांच्यासह ६४ संसद सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. 

कारवाईचा व्हिडीओ व्हायरल; कार्यकर्त्यांमध्ये संतापn नंतर त्या रस्त्यावर धरणे आंदोलनास बसल्या. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, ते शक्य झाले नाही. त्यानंतर प्रियांका गांधी यांना महिला पोलिसांनी अक्षरश: ओढत, फरफटत ताब्यात घेतले. n अन्य एका व्हिडीओत महिला पोलीस त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविताना, धक्काबुक्की करताना दिसत आहेत. 

प्रियांका गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सकाळी गॅस सिलिंडरसह काँग्रेस मुख्यालयातून बाहेर निघाले तेव्हा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. काळ्या रंगाची सलवार-कमीज आणि दुपट्टा परिधान केलेल्या प्रियांका गांधी यांनी पक्ष मुख्यालयासमोर पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्सवरून उडी मारली. त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना घेरले.

हे हुकूमशाही सरकार घाबरलेले आहे. भारताच्या परिस्थितीची, महागाईची आणि ऐतिहासिक बेरोजगारीची त्यांना भीती वाटत आहे. ते वास्तवाला घाबरतात, आवाज उठविणाऱ्याला धमकावतात.     - राहुल गांधी

पोलिसांना वाटते की, ते विरोधकांना दाबू शकतात. आम्ही दबावात येऊन बसमध्ये बसू; पण आम्ही असे का करावे? यांचे मंत्री म्हणतात की, महागाई दिसत नाही. आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन महागाई दाखवू इच्छितो.         - प्रियांका गांधी

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसInflationमहागाई