प्रियंका गांधी मुलीसमान असल्याचे म्हटलेच नव्हते - मोदी
By Admin | Updated: May 2, 2014 14:44 IST2014-05-02T14:18:49+5:302014-05-02T14:44:40+5:30
दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीमध्ये प्रियंका गांधी मुलीप्रमाणे असल्याचे वक्तव्य केलेच नव्हते असे स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी दिले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

प्रियंका गांधी मुलीसमान असल्याचे म्हटलेच नव्हते - मोदी
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीमध्ये प्रियंका गांधी मुलीप्रमाणे असल्याचे वक्तव्य केलेच नव्हते असे स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी दिले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची चिन्हे आहेत.
दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीमध्ये नरेंद्र मोदींनी प्रियंका गांधी मुलीप्रमाणे असल्याचे म्हटले होते. पण दुरदर्शनने नेमका हाच भाग दुरदर्शनने वगळला असा आरोप मोदी समर्थकांनी केला होता. प्रियंका गांधींनीही मी राजीव गांधीची मुलगी असल्याचे सांगत मोदींना प्रतुत्तर दिले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीचे एडीट न केलेले व्हिडीओ फुटेज प्रकाशित केले आहे.
मुलीविषयी नाराजी नसेलच
प्रियंका गांधी वारंवार टीका करत आहेत. यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न मोदी यांना विचारण्यात आला होता. यावर मोदी म्हणाले, कोणतीही मुलगी तिच्या भावाच्या आणि आईच्या विजयासाठी काहीही करु शकते. आपण त्या मुलीला संधी द्यायलाच हवी. मुलगी आई आणि भावासाठी मेहनत नाही घेणार तर कोणासाठी करेल. या दरम्यान मुलगी काही जरी बोलली तर तिच्याविषयी नाराजी नसेलच असे मोदींनी म्हणाले होते.