प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाल्यानं हॉस्पिटलमध्ये केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 03:21 PM2017-08-25T15:21:42+5:302017-08-25T15:28:45+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे उपचारांसाठी प्रियंका गांधी यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Priyanka Gandhi-Vadra has been admitted to the hospital due to dengue infection | प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाल्यानं हॉस्पिटलमध्ये केले दाखल

प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाल्यानं हॉस्पिटलमध्ये केले दाखल

Next

नवी दिल्ली, दि. 25 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी-वाड्रा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे उपचारांसाठी प्रियंका गांधी यांना राजधानी नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

हॉस्पिटलमधील व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर डी.एस.राणा यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांना डेंग्यूमुळे ताप आला होता. मात्र योग्य ते उपचार घेतल्यानंतर आता त्यांची प्रकृती ठीक आहे. हॉस्पिटलमधील अधिका-यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांना ताप आल्यानंतर 23 ऑगस्टच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वरिष्ठ डॉक्टर अरुप बसू यांच्या देखरेखीअंतर्गत प्रियंका गांधींवर उपचार प्रक्रीया सुरू होती. 

दरम्यान, आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

Web Title: Priyanka Gandhi-Vadra has been admitted to the hospital due to dengue infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.