शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 07:37 IST

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

लखनऊ: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक झाली. यावरुन मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई का होत आहे? असा सवाल काँग्रेससह विरोधकांनी उपस्थित केला आहे. नीरव मोदीला अटक झाली. हे यश आहे का? तो कुणामुळे पळून गेला होता?, असे सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उपस्थित केले आहेत. नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. नीरवला झालेली अटक म्हणजे मोदी सरकारचं मोठं यश असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. यावरुन प्रियंका गांधींनी सरकारवर तोंडसुख घेतलं. 'यात यश कसलं? त्याला भारताबाहेर कोणी जाऊ दिलं होतं?,' असे प्रश्न त्यांनी विचारले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी-वाड्रा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नीरव मोदीच्या अटकेवर भाष्य केलं. नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही, असंदेखील त्या म्हणाल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही नीरवच्या अटकेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'मोदी सरकारनंच नीरवला देश सोडून जाण्यात मदत केली आणि आता तेच त्याला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीसाठी या घडामोडी सुरू आहेत. निवडणूक झाल्यावर त्याला परत पाठवण्यात येईल,' असं आझाद म्हणाले. नीरवला लंडनमधील न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरवनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. नीरवला जामीन दिल्यास तो कदाचित न्यायालयाला शरण येणार नाही, असं जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्तींनी म्हटलं. पीएनबीला 13,500 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरवला भारताच्या स्वाधीन करण्यात यावं, अशी मागणी मोदी सरकारकडून ब्रिटनकडे करण्यात आली आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा