'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 10:36 AM2020-08-19T10:36:56+5:302020-08-19T10:38:34+5:30

प्रियंका यांनी संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मीही त्यांच्या या मताशी सहमत आहे.

priyanka gandhi says, 'Congress party leadership should be taken care of by someone other than Gandhi family members' | 'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

Next
ठळक मुद्देप्रियंका यांनी संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मीही त्यांच्या या मताशी सहमत आहे. पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कौटुंबिक स्वास्थ बिघडले असून आपल्या दोन्ही मुलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही प्रियंका यांनी म्हटलंय.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षातील नेतृत्वाबाबत आपलं मत मांडलं आहे. एका पुस्तकात छापून आलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंका यांनी देशातील काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत विचार मांडले आहेत. इंग्रजी वर्तमानपत्र टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. यापूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही असेच वक्तव्य केले होते. तर, आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामाही राहुल यांनी दिला आहे. 

प्रियंका यांनी संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मीही त्यांच्या या मताशी सहमत आहे. मला हेही वाटतंय की, पक्षाने आता आपला रस्ता निवडण्याची गरज आहे. भाजपा विरोधी विचारांच्या लढाईत काँग्रेस पराभूत झालीय का? असा प्रश्नही प्रियंका यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, मला वाटतंय काँग्रेसने नवीन माध्यमांना (सोशल मीडिया) समजण्यास उशीर केला. कारण, पक्षाने या माध्यमाचा वापर करुन आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली, तोपर्यंत खूप नुकसान झाले होते. भविष्यात जर कोणी गांधी कुटुंबीयांशिवाय काँग्रेसचा अध्यक्ष बनला, तर त्यांच्या आदेशाचे व निर्देशांचे आपण पालन करणार, असेही प्रियंका यांनी म्हटले आहे. 

पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कौटुंबिक स्वास्थ बिघडले असून आपल्या दोन्ही मुलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही प्रियंका यांनी म्हटलंय. माझ्या पतीवर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले, त्यावेळी माझ्या 13 वर्षीय मुलाला मी सर्व बाजू समजावून सांगितल्या. मी त्यास सर्व व्यवहार दाखवले. माझ्या मुलीलाही तेच सांगितले. मी माझ्या मुलांपासून काहीच लपवत नाही, आपल्या चुका व कमजोरी हेही त्यांच्यासोबत शेअर करत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: priyanka gandhi says, 'Congress party leadership should be taken care of by someone other than Gandhi family members'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.