शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

"पंतप्रधानांच्या घरावर 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरं होईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:12 IST

Congress Priyanka Gandhi Slams Modi Government : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. कोरोना महामारीच्या काळातच या प्रोजेक्टला पर्यावरण संबंधातील सर्व प्रकारची मंजुरी देण्यात आली आहे. यावरूनही प्रियंका यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं असून निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करत पंतप्रधान मोदींसाठी नवीन घर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी एवढा पैसा रूग्णांवर खर्च केला तर बरं होईल असं म्हटलं आहे. 

मोदी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "देशातील लोक जेव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल. अशा प्रकारच्या खर्चांमुळे अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे असा संदेश लोकांमध्ये जातो" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा (Central Vista Project) समावेश आवश्यक सेवांमध्ये केला आहे. लॉकडाउन सारख्या निर्बंधांच्या काळातही हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता या कामाला आणखी वेग येईल. महत्वाचे म्हणजे, विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही सरकारने एका निश्चित वेळेत संसद भवन आणि इतर इमारतींचा कायाकल्प करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबरला या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे, त्यांत पंतप्रधान निवासस्थानाचाही (Prime Minister's residence) समावेश आहे. याच वेळेत, पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजीचे मुख्यालयदेखील याच डिसेंबर 2022 च्या निर्धारित वेळेत पूर्ण होईल.

उपराष्ट्रपतींचे निवासस्थानही पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या प्रोजेक्टसाठी जवळपास 13,450 कोटी रुपये लागणार आहेत. तसेच या कामासाठी जवळपास 46 हजार लोक लागतील अशी अपेक्षा आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक सातत्याने या नव्या संसद भवनाच्या निर्माण कार्यावर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. सोशल मिडियावरही लोग कोरोना काळात या इमारतीवर होत असलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या लोकांचे म्हणणे आहे, की देशात रुग्णालय, ऑक्सिजन आणि औषधींचा तुटवडा जाणवत आहे. अशा काळात ऑक्सिजन, बेड तथा इतर आवश्यक गोष्टी जमविण्याऐवजी सरकार या प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPoliticsराजकारणcongressकाँग्रेस