शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:11 IST

Priyanka Gandhi : '2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले.'

Priyanka Gandhi :काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी मंगळवारी(21 जानेवारी) भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. भाजप आणि आरएसएसची भ्याड विचारधारा आहे, असा आरोप त्यांनी केला. जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीला संबोधित करताना प्रियंकांनी दावा केला की, राहुल गांधी संविधानासाठी लढत असल्याने केंद्र सरकार त्यांना घाबरते. देशासाठी बलिदान देण्याचा विचार काँग्रेसच्या मनात आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, संविधान हे फक्त पुस्तक नसून, लोकांचे संरक्षण कवच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा त्यात समावेश केला. बाबासाहेब सामाजिक न्याय आणि हक्काचे प्रतीक आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली, पण असे एकही सरकार आले नाही, ज्यांच्या गृहमंत्र्यांनी संसदेत बाबासाहेबांचा अपमान केला असेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

या विचारसरणीने संविधानाच्या विरोधात प्रचार केलाप्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही, अशी वक्तव्ये केली जातात, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. संविधान बनवतानाही आरएसएसच्या विचारसरणीने अपमान केला होता. या विचारसरणीने संविधानाच्या विरोधात मोहीम उघडली होती. देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान झाला आहे.

सरकार राहुल गांधींना घाबरते2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले. निवडणुकीनंतर संसदेत गेल्यावर त्यांनी लगेच संविधानाला अभिवादन केले. पण, राहुल गांधी रोज संविधानासाठी लढतात. यासाठी ते प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत. त्यामुळेच हे सरकार राहुल गांधींना घाबरते. त्यांना पाहून सरकार थरथर कापते, अशी टीकाही प्रियंकांनी यावेळी केली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस