Priyanka Gandhi on GST : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी देशातील महागाई आणि करप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका एक्स पोस्टमध्ये त्या म्हणतात, 'कॉर्पोरेट्सना लाखो कोटींचे जीवनदान देणारे भाजप सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून जीवन विमा आणि आयुष्यातील मूलभूत गरजांवरही कर वसूल करत आहे. सामान्यांसाठी GST चा अर्थ 'गृहस्थी सत्यानाश टैक्स' झाला आहे.'
याच पोस्टमध्ये प्रियंका गांधी पुढे म्हणतात, 'एका रिपोर्टनुसार, एकूण जीएसटीपैकी 90 टक्के गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून वसूल केला जात आहे. तर जीएसटीमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या 10 टक्के लोकसंख्येचे योगदान केवळ 3 टक्के आहे. कॉर्पोरेट कराचा दर 30% वरुन 22% केला आणि गरीब लोकांकडून रोटी-डाळवरही कर वसुली केली जात आहे.'
भारतात सध्या 7 प्रकारचे कर चालू यासोबतच काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, 'कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जीएसटी आणण्यात आला होता, परंतु असे काहीही झाले नाही. जगातील इतर देशांमध्ये एक किंवा दोन प्रकारचे कर आहेत, परंतु भारतात सध्या सुमारे 7 प्रकारचे कर आहेत. जीएसटीचे सरलीकरण देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जीएसटीच्या नावाखाली सरकारने ज्या प्रकारे गरिबांवर बोजा लादला आहे, त्याला आमचा विरोध आहे.'
मल्लिकार्जुन खरगेंची टीकाकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, यांनीदेखील कर वसुलीवरुन भाजपवर निशाणा साधला. "गब्बर सिंह टैक्स" म्हणा, "गृहस्थी सत्यानाश टैक्स" म्हणा, किंवा "Give Sitharaman Tax" म्हणा...भाजपच्या GST ला काहीही नाव द्या, एक गोष्ट पक्की आहे. मोदी सरकारने GST ला गरीब आणि मध्यम वर्गाची कमाई लुटण्याचे साधन बनवले आहे. आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोदी सरकारने हा कर दहशतवाद आणि जनतेची लूट थांबवावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.'