शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 10:52 IST

प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.

ठळक मुद्दे प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

लखनौ - प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्येप्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. आता राज्यातील आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी मोठी खेळी खेळण्याची तयारी काँग्रेसने केली असून, 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणातील प्रवेश हा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पक्षाची नजर आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रियंका यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. प्रियंका गांधी यांच्या सोमवारी होणाऱ्या रोड शो पूर्वी काही काँग्रेसी नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. दरम्यान, एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये एकहाती वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेसची सध्या बिकट अवस्था झाली आहे. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. 1989 नंतर पक्ष उत्तर प्रदेशमधील सत्तेतून बाहेर आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांना चेहरा म्हणून समोर आणले तर पक्षाला संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांना आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसPoliticsराजकारण